नागपूर: संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराच्या प्रस्तावाला संताजी अखिल तेली समाज कन्हान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांनी दिनांक १८ मार्च २०२५ रोजी संस्थेच्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव दिला.
नागपूर : तेली समाज सभा, नागपूर (जिल्हा) अंतर्गत युवक सूचक समितीतर्फे युवक-युवती परिचय मेळावा आणि "रेशीमबंध" पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्यतेने पार पडणार आहे. सर्व तेली समाज बांधवांना या संधीचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर तेली समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा रविवारी मातोश्री लॉनवर स्व. देवीदास बाबुराव साबणे नगरी येथे उत्साहात संपन्न झाला. खा. संदीपान भुमरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे होते.
लातूर: विरशैव तेली समाजाने गेल्या 50 वर्षांपासून जपलेली अखंड परंपरा यावर्षीही महाशिवरात्रीच्या निमित्ताने साजरी करण्यात आली. श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान येथे अमावस्येच्या दिवशी गंगाजल अभिषेक व मानाची काठी लावून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजाचे अध्यक्ष श्री किशोर भुजबळ यांच्या हस्ते मानाच्या काठीचे पूजन करण्यात आले.
वीरशैव तेली समाज लातूर,महिला मंडळ आयोजित मकर-संक्रांती निमित्त हळदी कुंकू समारंभ दिनांक 26 जानेवारी रोजी,वीरशैव सांस्कृतिक भवन लातूर येथे भव्य स्वरूपात पार पडला. याप्रसंगी हळदी कुंकू संमारंभाचे उद्घाटन डॉ. सौ. अर्चनताई पाटील चाकुरकर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. उषा फेसगाळे, सौ. माया कलशेट्टी, सौ. मिनाक्षी राऊत, सौ. माहेश्वरी क्षीरसागर,