Sant Santaji Maharaj Jagnade
खळेगांव येथे महाप्रसाद व अभिवादन सोहळा, तेली समाजाचा उत्साह शिगेलाबुलढाणा - संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती यंदा तेली समाज बुलढाण्यात उत्साहात साजरी करणार आहे. जय संताजी तेली समाज व जय संताजी नवयुवक मंडळ, खळेगांव (ता. लोणार) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत भव्य अभिवादन सोहळा
संताजी ब्रिगेड व तेली समाज महासभेच्या वतीने शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजननागपूर : संताजी ब्रिगेड महाराष्ट्र व तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा-२०२५ अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणार आहे. हा सोहळा सोमवार, दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न होईल.
आसगाव : संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी झाला. असून त्याच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यानिमित्ताने संताजी समितीकडून महाराष्ट्र वारकरी विद्यापीठच्या माध्यमातून संतांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्न मंजूषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला, ३ नोव्हेंबर २०२५ – श्री संताजी महाराज स्नेही मंडळ, अकोला यांच्या वतीने तिळवण तेली समाज वधु-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे.
नागपूर: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जवाहर विद्यार्थी गृहाच्या वतीने आयोजित तेली समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याला सिव्हिल लाइन्स येथील लॉनवर प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष शेखर सावरबांधे यांनी भूषवले.