नागपूर, २०२५: जवाहर विद्यार्थिगृह, नागपूर येथील त्रैवार्षिक निवडणुकीत संताजी विकास पॅनलने घवघवीत यश मिळवले असून, पुरोगामी पॅनलचा पराभव झाला आहे. या चुरशीच्या निवडणुकीत संताजी विकास पॅनलचे १७ उमेदवार विजयी झाले, तर पुरोगामी पॅनलचे केवळ दोन उमेदवारांना यश मिळाले.
नागपूर: संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा आणि संताजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान करत त्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबवला गेला.
श्री संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने शेगाव येथे नुकतेच तेली समाजाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कॅट संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष तसेच चेलीपुरा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कचरू वेळंजकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
नागपूर येथे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा आणि जवाहर विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मे ते 18 मे 2025 या कालावधीत "एक पाऊल पुढे: भीष्मकालीन संस्कार शिबीर 2025" आयोजित करण्यात आले. या शिबिराचा समारोप आनंदोत्सवात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
महाराष्ट्रातील तेली समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवार, दिनांक ११ मे २०२५ रोजी संत नगरी शेगांव, जिल्हा बुलढाणा येथील अग्रसेन भवनात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. श्री संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते,