महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, उमरेड जि. नागपूर, संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा निमीत्य भव्य रक्तदान शिबीर मंगळवार, दिनांक ०९ जानेवारी २०२४ ला वेळ : ९.०० ते ४.०० वाजेपर्यंत स्थळ: साने गुरुजी जेष्ठ नागरीक भवन आशिर्वाद मंगल कार्यालय जवळ, उमरेड
श्री वारकरी प्रबोधन महासमिती (महाराष्ट्र) तर्फे श्री पांडुरंग पालखी सोहळा श्री राम मंदिर, कॉटनग्रीन ते श्री विठ्ठल मंदिर, वडाळा मुंबई (वर्ष २४वे) आयोजित करत असतात. आपण संत संताजी जगनाडे महाराज चौक, लालबाग मुंबई येथे पालखीचे समाज बंधु भगिनींतर्फे भव्य स्वागत करत असतो.
- अनुज हुलके, विदर्भ तेली समाज महासंघ स्थापन होण्यापूर्वी तेली समाजाला हीन लेखणाऱ्या काही घटना घडल्या. त्याच्या निषेधाचे तीव्र पडसाद समाजात उमटले. त्यानंतर तेली समाज आणि इतरही काही शेतकरी-कष्टकरी असलेल्या शुद्र जाती आणि स्त्रियांबद्दल हीन लेखन केलेल्या साहित्याची चर्चा होऊ लागली. यात प्रामुख्याने मनुस्मृतीचा उल्लेख होऊ लागला. आणि हिन लेखल्या गेलेल्या समाजात एकप्रकारे अस्मिता जागृत होऊ लागली.
बेलापूर - बेलापूर येथील श्री संतजी जगनाडे महाराज मंदिरामध्ये नुकतीच तिळवण तेली समाजाची बैठक संपन्न झाली. सदरची बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकराव भिकचंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
देहूगाव : श्री संत संताजी महाराज जगनाडे महाराज है संत तुकाराम महाराजांचे चौदा टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी व शिष्य होते. त्यांच्या समवेत चौदा टाळकऱ्यांपैकी एक असलेले आणखी दुसरे टाळकरी. म्हणजे श्री संत गेवरशेठ वाणी हे होय. या दोन्ही टाळकरी संतांची समाधी सुदुंबरे (ता. मावळ) येथे आहे. संत संताजी महाराज जगनाडे यांचे मूळ गाव चाकण (ता. खेड) हे होते. मात्र ते आपल्या आजोळी राहत होते.