Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

तेली समाज संस्था, बाराभाटी आयोजीत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा

teli Samaj Sanstha Barabhati ayojit Sant Shiromani Santaji Jagnade Maharaj punyatithi    तेली समाज संस्था, बाराभाटी / रेल्वे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम ०२ जानेवारी २०२४ रोज मंगळवार स्थळः-श्री.संत जगनाडे महाराज चौक बाराभाटी, तेली समाज संघटना, बाराभाटी च्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित केला असून उपरोक्त कार्यक्रमास सर्वांची उपस्थिती राहण्‍याचे आवाहन करण्‍यात आलेले आहे.

दिनांक 25-12-2023 12:43:10 Read more

संत शिरोमणी संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा उमरी /लवारी साकोली जिल्हा भंडारा येथे उत्‍साहात संपन्‍न.

Saint Shiromani Saint Santaji Jaganade Mahara punyatithi sohala Sakoli Bhandara district     परमपूज्य संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी सोहळा समिती तर्फे 19 व 20/12/23 या दोन दिवशी उमरी /लवारी साकोली जिल्हा भंडारा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम व प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती जागृतीचा कार्यक्रम श्री संत डोमाजी कापगते महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

दिनांक 22-12-2023 14:35:36 Read more

अहमदनगर तिळवण तेली समाज वधू- वर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

ahmednagar teli samaj vadhu var melava Sampanna     अहमदनगर येथे रविवारी आयोजित तिळवण तेली समाज व संताजी विचार मंच ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित तिळवण तेली समाज वधू- वर पालक परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सात वर्षांपासून सुरू केलेला वधू-वर पालक परिचय मेळावा कौतुकास्पद असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांनी गौरवोद्गार काढले.

दिनांक 22-12-2023 14:01:58 Read more

तेली समाज वधूवर मेळावा सातारा २३ डिसेंबर ला

    सातारा श्री संताजी शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था सातारा महाराष्ट्र यांच्या वतीने २३ डिसेंबर रोजी साई दत्त मंगल कार्यालय, वाढे फाटा सातारा येथे तेली समाज मेळावा आयोजित केला आहे. या समाजमेळाव्या अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. समाजातील प्रतिष्ठित व सामाजिक काम करणारे व्यक्तींचाही सत्कार करण्यात येणार आहे.

दिनांक 22-12-2023 13:46:40 Read more

यवतमाळ तेली समाजा वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना संपन्‍न

Shri Sant Santaji Jagnade Maharaj Murti Pran pratishthapana by Yavatmal teli Samaj     यवतमाळ जिल्ह्यातील  तालुका नेर येथे दिनांक 8/12/23 रोजी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच गाव कुशीत पावन असलेले   मानंकी आंबा येथील श्री संत उद्धव बाबा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असता दिनांक 10/12/23 ला नेर शहरातून अनेक गावातील भजनी मंडळे

दिनांक 22-12-2023 00:54:44 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in