राष्ट्रीय तेली समाज महासंघाने ऑल इंडिया तैलिक साहू महासभा, नवी दिल्लीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी नवीन सभासद नोंदणीची मोहीम हाती घेतली आहे. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जयदत्त अण्णा क्षीरसागर (बीड) यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम देशभरात राबविली जात आहे.
धुळे : कालदर्शन फाऊंडेशन, अमळनेर यांच्या वतीने राज्यस्तरीय तेली समाज फ्रेश वधू-वर परिचय सुची पुस्तिका 2025 साठी धुळे जिल्ह्यातील तेली समाजातील इच्छुक वधू-वर पालकांनी फॉर्म भरून पाठवावे. फॉर्म भरण्यासाठी संपर्क क्रमांक : 9960093502.
गंगापूर दि.८ डिसेंबर: श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची यांची ४०० वी जयंती साजरी करण्यात आली संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर मध्ये संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली.
साखरखेर्डा : संत तुकाराम महाराज यांची अभंग गाथा इंद्रायणी नदी पात्रात सोडण्यात आली. त्यावेळी पुन्हा अभंग गाथा जिवंत करण्याचे काम संताजी जगनाडे महाराज यांनी केले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे विचार कोणीही नष्ट करू शकत नाही. हा संदेश संताजी जगनाडे महाराज यांनी समाजाला दिला. म्हणून आज गाथा तुमच्या आमच्या समोर आहे.
शनिवार दि. 21.12.2024 रोजी वैरागड येथे श्री. प्रमोदजी पिपरे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा तथा उपाध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली,यांनी आपल्या मार्गदर्शनात असे म्हटले कि.महाराष्ट्रला अनेक थोर मोठ्या संत महात्म्याची परंपरा लाभली आहे.