धुळे - खान्देश तेली समाज मंडळाच्या मेळाव्याने संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला असून आपल्या मेळाव्याच्या माध्यमातून दरवर्षी अनेक विवाह जुळून खरी समाजसेवा मंडळाचे कार्यकर्ते करत असल्याचे प्रतिपादन माजी महापौर सौ.कल्पना महाले यांनी केले ते खान्देश तेली समाज मंडळ आयोजित वधू वर परिचय मेळाव्याचे फॉर्म प्रकाशन वेळी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
पिंपरी-चिंचवड: तेली समाजाने हुंडा प्रथा आणि लग्नातील अनिष्ट प्रथांना मुळापासून उच्चाटन करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. संताजी सेवा प्रतिष्ठान आणि प्रदेश तेली महासंघाच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर चौकात तेली समाजबांधवांनी एकत्र येऊन हुंडाविरोधी शपथ घेतली.
राष्ट्रीय तेली समाज महासंघाने ऑल इंडिया तैलिक साहू महासभा, नवी दिल्लीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी नवीन सभासद नोंदणीची मोहीम हाती घेतली आहे. या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जयदत्त अण्णा क्षीरसागर (बीड) यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम देशभरात राबविली जात आहे.
धुळे : कालदर्शन फाऊंडेशन, अमळनेर यांच्या वतीने राज्यस्तरीय तेली समाज फ्रेश वधू-वर परिचय सुची पुस्तिका 2025 साठी धुळे जिल्ह्यातील तेली समाजातील इच्छुक वधू-वर पालकांनी फॉर्म भरून पाठवावे. फॉर्म भरण्यासाठी संपर्क क्रमांक : 9960093502.
गंगापूर दि.८ डिसेंबर: श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची यांची ४०० वी जयंती साजरी करण्यात आली संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर मध्ये संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली.