शहरातील वीरशैव तेली समाजातील इयत्ता दहावी, बारावी, नीट, सीईटी तसेच एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वीरशैव तेली समाजाच्या वतीने 28 जुलै रोजी घेण्यात आला.
अमरावती : तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि सामाजिक उपक्रम राबवित समाजपयोगी कामात अग्रेसर असलेल्या श्री संताजी समाज विकास संस्थेतर्फे येत्या १२ मे रोजी सर्व शाखीय तेली समाजातील पुनर्विवाह इच्छुक विधवा, विधुर, घटस्फोटीत, अपंग आणि वयस्क यांच्या विदर्भस्तरीय विशेष परिचय मेळाव्याचे आयोजन
संताजी प्रतिष्ठाण लाखांदूर,आयोजीत जागतीक आरोग्य दिना निमित्ताने दिनांक ०७ एप्रिल २०२४ रोज रविवारला सकाळी १०.३० ते ३.०० वाजेपर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन केले आहे. परिसरातील सर्व जनतेने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा फायदा घ्यावा ही विनंती करण्यात आलेली आहे.
श्री संताजी तेली समाज सेवा मंडळ, बिबवेवाडी द्वारा स्नेहमेळावा आणि हळदी-कुंकू समारंभ आयोजीत केला आहे. दिनांक शनिवार दि. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ०५ ते ०९ वा. स्थळ स्व. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे सभागृह गणेश मंचच, अप्पर सुप्पर, व्हि.आय.टी. शाळे जवळ, बिबवेवाडी, पुणे-३७. या कार्यक्रमास सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
तेल्हारा महिला मंडळ व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने तेली समाजाचे आराध्य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे दिनांक 10 जानेवारी 2024 ला साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. प्रभा पोहणे ह्या तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. पुष्पा खोडे, सौ प्रीती गुल्हाने,