श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन व भव्य दिव्य दिंडी शोभा यात्रा आयोजन करण्यात आले होते. तेली युवा संघटना महाराष्ट्र राज्य ग्रुप तर्फे सर्व समाज बांधवा छत्रपती संभाजी नगर कार्यक्रमाचे वेळी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे पूजन माजी नगर सेवक भा ज पा कार्यकारणी प्रदेश अध्यक्ष अनिल भैय्या मकरिया साहेब यांच्या हस्ते करण्यात आले
कोपरगाव येथे आज संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे उपस्थित राहिले व यावेळी आयोजित ह.भ.प. अरुण महाराज मगर यांच्या कीर्तनाचा लाभ घेतला.
जळगांव जामोद व संग्रामपूर तालुका, जिल्हा बुलढाणा तेली समाज राज्यस्तरीय भव्य मोफत वधु -वर व पालक परिचय मेळावा तथा सोयरिक पुस्तिकेचे विमोचन स्थळ : सांस्कृतिक भवन, जलाराम मंदीराजवळ, जळगांव जामोद जि. बुलढाणा - ४४३४०२ टिप : सोयरिक पुस्तकात परिचय पत्र मोफत छापण्यात येणार आहे. परियच पत्र देण्याची अंतिम तारिख २५/०१/२०२४
समस्त तिळवण तेली समाज संघटना, कोरेगाव, ता. कोरेगाव जि. सातारा च्या वतीने मार्गशीर्ष वद्य १३ मंगळवार दि. ९ जानेवारी २०२४ रोजी. प्रमुख पाहुणे - मा. सागर नारायण वीरकर (कोरेगाव पंचायत नगरसेवक) मा. चंद्रकांत वाघचौडे ( जाखनगाव उपसरपंच) सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. अनिल भोज (मा.अध्यक्ष) श्री.सुरेश किर्वे (मा.अध्यक्ष)
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, उमरेड जि. नागपूर, संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा निमीत्य भव्य रक्तदान शिबीर मंगळवार, दिनांक ०९ जानेवारी २०२४ ला वेळ : ९.०० ते ४.०० वाजेपर्यंत स्थळ: साने गुरुजी जेष्ठ नागरीक भवन आशिर्वाद मंगल कार्यालय जवळ, उमरेड