अहमदनगर- संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणीनुसार तेली समाजाची वाटचाल सुरू आहे. प्रत्येकाने एकमेकांशी आपुलकीने व प्रेमाने वागावे. श्री संताजी महाराजांनी जगद्गुरु संत तुकोबाराय यांची बुडालेली गाथा पुन्हा तंतोतंत लेखन करून समाजापुढे आणली.
सावरगाव : येथील ग्रामपंचायतीमध्ये श्री संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपसरपंच राजू गिरडकर, सदस्य मंगेश दाढे, एकनाथ रेवतकर, विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी अजय नितनवरे, शेषराव फुके, सुरेश जयस्वाल, पंजाब हिरुडकर, हिंमत नखाते
दिनांक ८ डिसेंबर संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे 400 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व लातूर जिल्हा सेवाभावी संस्थेच्या वतीने ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. अमोल बाल संस्कार केंद्रात जगनाडे महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून ही जयंती साजरी करण्यात आली. लातूर जिल्हा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जी होलकांबे
जवळा - तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे वारकरी संप्रदायातील श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे जवळे ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये महिलांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य कृष्णाजी बडवे, पारनेर तालुका तिळवण तेली समाज पारनेर उपाध्यक्ष शिरीष शेलार यांनी संताजी महाराज जगनाडे यांच्या जीवन चरित्रा बद्दल आपल्या भाषणातून सांगितले.
तिळवण तेली समाज ट्रस्ट, अ.नगर आयोजित संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शहरस्तरीय चित्रकला स्पर्धा २०२३ रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० वाजता * बक्षिस वितरण : स्पर्धा संपल्यानंतर अर्ध्या तासाने ११.३० वा. त्याच ठिकाणी होईल.