धुळे - संपूर्ण खान्देशातील तेली समाजामध्ये नावलौकिक प्राप्त असलेल्या खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या पदाधिकारींनी आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाचे दिवशी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा सत्कार करून एक अभिनव उपक्रम राबवला व आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.
श्री राष्ट्रीय संत संताजी महाराज जगनाडे व वारकरी सांप्रदायाचे दैवत श्री भगवान विठ्ठल यांची सुमारे १० फुट उंचीची भव्य मुर्ती चा समर्पण सोहळा व श्री संत संताजी महाराज म्युझीयम भुमीपूजन सोहळा मिती माघ कृ.१२ शके १९४४ (भागवती एकादशी) कार्यक्रमाचे स्थळ श्री संत संताजी महाराज म्युझियम बेलबाग, श्री क्षेत्र पिंपळनेर, ता.पारनेर, जि.अहमदनगर शुक्रवार दि.१७/०२/२०२३ रोजी
सिन्नर, ता. ११ : सिन्नर शहरातील प्रतिथयश व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते माणिकराव रामभाऊ रायजादे (६८) यांचे बीडवरून सिन्नरकडे परत येत असताना कार उलटून झालेल्या अपघातात निधन झाला. शनिवारी (ता. ११) दुपारी हा गेवराई - औरंगाबाद दरम्यान हा अपघात झाला.
अहमदनगर जिल्हा तेली समाजाचे शिलेदार राहता तालुक्याचे जेष्ठ मार्गदर्शक सदैव स्मरणात राहील असे समाज कार्याचा महामेरू आदरणीय कै. बाबुरावजी साळुंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अहमदनगर जिल्हा तेली समाज याअंतर्गत राहता तालुका तेली समाजाची प्राथमिक बैठक रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर कनकुरी रोड शिर्डी येथे मोठया उत्साहात संपन्न झाली.
श्री साईबाबांच्या पुण्यनगरीत लवकरच श्री साईबाबा सेवा संस्थान, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, शिर्डी ग्रामस्थ, अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व सर्वांच्या सहभागातून होणार आहे सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा 2023 वर्ष 2 रे ज्या प्रमाणे आपण श्री साईलीला पालखी सोहळा समिती स्थापन करून आपला पालखी सोहळा गेल्या 20 वर्षांपासून यशस्वी करत आहोत