Sant Santaji Maharaj Jagnade
शिर्डी :- शिर्डी शहरातील श्री साईबाबा समाधी मंदिर प्रवेशद्वार गेट क्र ४ येथील चौकाला श्री संत संताजी महाराज चौक असे नामकरण करून त्याचे उद्घाटन शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री सतीश दिघे साहेब, प्रथम नगराध्यक्ष श्री कैलास बापु कोते, माजी नगराध्यक्ष श्री शिवाजीराजे गोंदकर, भाजपा शहर अध्यक्ष श्री सचिन भाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत फित कापून करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथे तेली समाजाच्या वतीने संताजी चौक एन २ सिडको, राजीव गांधी नगर येथे आभिवादन करण्यात आले. संताजी चौकाच्या नामफलकाचे पूजन माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष राधाकिसन सिदलंबे हे होते.
श्रीगोंदा : काष्टी मध्ये सर्व जाती... धर्म ... पंथनी... एकत्र येऊन सर्व धर्म समभावाने राष्ट्रीय ऐक्य साधत... जगद्गुरु संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांची ३९९ वी जयंती जन्मोत्सव काष्टी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी केली.
प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने विविध कार्यक्रमांनी संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरीअहमदनगर- संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणीनुसार तेली समाजाची वाटचाल सुरू आहे. प्रत्येकाने एकमेकांशी आपुलकीने व प्रेमाने वागावे. श्री संताजी महाराजांनी जगद्गुरु संत तुकोबाराय यांची बुडालेली गाथा पुन्हा तंतोतंत लेखन करून समाजापुढे आणली.
सावरगाव : येथील ग्रामपंचायतीमध्ये श्री संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपसरपंच राजू गिरडकर, सदस्य मंगेश दाढे, एकनाथ रेवतकर, विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी अजय नितनवरे, शेषराव फुके, सुरेश जयस्वाल, पंजाब हिरुडकर, हिंमत नखाते