औरंगाबाद तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा -२०२४ व सामुदायिक विवाह सोहळा वेळ - सकाळी ९ ते सायं. ६.०० वा. रविवार दि. २८ जानेवारी २०२४. मेळाव्याचे ठिकाण : मातोश्री लॉन्स, विमानतळ शेजारी, धुत हॉस्पिटल जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर
फुलगाव (ता. हवेली) येथील मुख्य चौकास संत संताजी जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात आले. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे लेखन आणि रक्षण करण्याचे काम त्यांनी केले होते. तसेच तुकोबांच्या चौदा टाळकऱ्यांमध्ये मुख्य टाळकरी म्हणून त्यांचा समावेश होता. त्यांच्या ३९९ व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने
शिर्डी :- शिर्डी शहरातील श्री साईबाबा समाधी मंदिर प्रवेशद्वार गेट क्र ४ येथील चौकाला श्री संत संताजी महाराज चौक असे नामकरण करून त्याचे उद्घाटन शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री सतीश दिघे साहेब, प्रथम नगराध्यक्ष श्री कैलास बापु कोते, माजी नगराध्यक्ष श्री शिवाजीराजे गोंदकर, भाजपा शहर अध्यक्ष श्री सचिन भाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत फित कापून करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथे तेली समाजाच्या वतीने संताजी चौक एन २ सिडको, राजीव गांधी नगर येथे आभिवादन करण्यात आले. संताजी चौकाच्या नामफलकाचे पूजन माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष राधाकिसन सिदलंबे हे होते.
श्रीगोंदा : काष्टी मध्ये सर्व जाती... धर्म ... पंथनी... एकत्र येऊन सर्व धर्म समभावाने राष्ट्रीय ऐक्य साधत... जगद्गुरु संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांची ३९९ वी जयंती जन्मोत्सव काष्टी ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात साजरी केली.