पिढ्यान्पिढ्या चालत आलेले दगडी, बैलांचे लाकडी तेलघाणे इतिहासजमा झाले आणि ८० च्या दशकात वीजघाणे आले. त्यात खाद्य तेलविक्रीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या उतरल्या. कंपन्यांच्या जीवघेण्या स्पर्धेतही औरंगाबादेत पारंपरिक लाकडी तेलघाणे आपले अस्तित्व टिकवून दिमाखात सुरू आहेत.
दि ७/९/२०२२ रोजी श्री क्षेत्र देहू गाव जि. पुणे गावातील प्रवेशद्वार स्वागतकमान २०१७ साली उभारण्यात आली होती संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि त्यांच्या सोबत असलेल्या १४ टाळकरी यांची भक्तांना व वारकऱ्यांना कायम आठवण राहील अशी सुंदर व भव्यदिव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती परंतु श्री संत तुकाराम महाराज यांच्या १४ टाळकऱ्यां पैकी तेली समाजाचा मान बिंदू
कोरेगाव तालुका तिळवण तेली समाजाच्या वतीने आज कोरेगाव येथे मा. आमदार श्री महेशजी शिंदे, कोरेगाव - खटाव - सातारा यांची कोरेगाव येथे शासकीय विश्रामगृहात समक्ष भेट घेतली समाजाची गेल्या काही वर्षापासूनची प्रमुख मागणी समाज मंदिरा साठी जागा व सभामंडप या दोन गोष्टी आमदार साहेबांपुढे मांडल्या गेल्या.
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड या संस्थेच्या वतीने आज सौ. निशाताई यशवंत करपे यांचा पुणे पीपल्स को-ऑप. बँकेच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. सौ. निशाताई करपे या गेल्या वीस वर्षांपासून समाजातील विविध संस्थांच्या उच्च पदांवर कार्य करीत आहेत. तसेच त्या समाजाबाहेरील संस्थांवरही कार्यकर्त्या म्हणून कार्य करीत आहेत.
प्रदेश तेली महासंघ (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा-२०२२, रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत, मेळाव्याचे ठिकाण कै. सारजाबाई तुळशिराम चौधरी (उंबरखेडकर) नगर वैकुंठवासी ह.भ.प.माधवराव बबनराव अंबिके सभागृह श्री खंडोबा मंदिर मंगल कार्यालय जुना मुंबई-पुणे रस्ता, आकुर्डी, पुणे-४११०३५