जामनेर: शहरातील कमल हॉस्पिटल येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व प्रदेश तेली महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
जवळे : श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९८व्या जयंती जवळे (ता. पारनेर) येथे उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय, धर्मनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात तिळवण तेली समाज व विद्यालयाच्या वतीने प्रतिमापूजन करण्यात आले. जवळे ग्रामपंचायत कार्यालयातही जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच गोरख शिवाजी पठारे,
तिळवण तेली समाज तळेगाव दाभाडे शनी मारुती मंदिर येथे " श्री संत संताजी जगनाडे " महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी पुणे शहराचे विश्वस्त श्री प्रवीण शेठ बारमुख व तळेगाव शहराचे विश्वस्त देवेंद्र बारमुख यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी तळेगाव शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते
श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लाडगाव ता वैजापुर येथे साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष श्री. मनोज धनाड सर प्रमुख पाहुणे श्री. साईनाथ सोमवंशी सर श्री.विलास निगळ सर प्रमुख वक्ता श्री.अशोक साळुंके सर श्री. चेतन राजपूत सर तसेच सर्व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते..!!
नगर - श्री संत शिरोमणी संताजी महाराज जनागडे यांच्या जयंतीनिमित्त मोफत कृत्रिम दंतरोपण व रूट कॅनल शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. गोरे डेंटल हॉस्पिटल माळीवाडा, नगर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी व श्री संताजी नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने ८ डिसेंबर सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर शेजारी, श्री संताजी नागरी पतसंस्था, तेली पंचाचा वाडा, डाळमंडई येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.