Sant Santaji Maharaj Jagnade
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे, श्रीक्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे. श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम पत्रिका मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. १५ डिसेंबर २०२२ ते २२ डिसेंबर २०२२ अखंड हरिनाम सप्ताह.
दि. 8 रोजी धोंडराई येथे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार, वक्ते ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज मस्के सरांचे व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की संत संताजी जगनाडे महाराज यांनी तुकाराम गाथा लिहिण्याचे कार्य केले. तुकाराम गाथा म्हणजे साक्षात संत तुकाराम आहेत. संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळस आहेत आणि म्हणून संताजी महाराजांनी एका अर्थाने वारकरी संप्रदायाचा कळस वाचवण्याचे महान कार्य केले
शिर्डी - संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९८ व्या जयंतीनिमित्ताने शिर्डी शहर तेली समाज व शिर्डी नगरपरिषद शिर्डी यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिर्डी येथे सकाळी ९:०० वाजता अभिषेक पूजा दिलीप भाऊ राऊत व सौ आशाताई राऊत यांच्या हस्ते संपन्न झाली तर सकाळी १०:३० वाजता शिर्डी नगर परिषदेत मध्ये मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे साहेब
संत जगनाडे महाराजांचे विचार जीवनात प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे - डॉ. गिरिष कुलकर्णीनगर महाराष्ट्राला अनेक संतांची मोठी परंपरा आहे, या संतांनी आपल्या त्यागातून समाजाला जागृत करून दिशा देण्याचे काम केले आहे. संत संताजी महाराजांनी आपला प्रपंच, व्यवसाय आणि समाज यात उत्तम संतुलन साधत समाजोन्नत्तीचे काम केले त्यांचे विचार आणि कार्य आजही आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार जीवनात प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे.
संत श्री जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले - संभाजी कदमनगर - संतांचे विचार हे आपले जीवन सुखी करण्यासाठी आहेत. त्यांचे विचार आचरणात आणून आपण आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे. संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. संत श्री जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शक तत्वावर तिळवण तेली समाज ट्रस्ट काम करुन समाजोन्नत्ती करत आहे.