निमगाव केतकी - श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या ३७० व्या जयंतीनिमित्त निमगाव केतकी येथे अखिल तेली समाज संघटना व निमगाव केतकी येथील तिळवण तेली समाजाच्या वतीने सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट मंदिरामध्ये श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिर्डी - तेली समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे तेली यांच्या जयंती निमि त्त शिर्डी येथील वाचनालयात तेली समाजाचे सदगुरू श्रेष्ठ संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती साजरी करण्यात आली. शिर्डी शहरातील जेष्ठ सम जि बांधव व प्रगतशील शेतकरी हभप यशवंतराव वाघचौरे यांचे हस्ते प्रतिमपूजन करण्यात आले
पुणे - जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे लेखक व आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९७ वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. समस्त तेली समाज संताजी प्रतिष्ठान कोथरूड यांच्या वतीने कर्वे नगर येथील श्री संताजी भवन येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रमेश भोज यांचे मार्गदर्शन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
राहुरी नगरपरिषदेच्या वतीने जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राहुरी तालुक्याचे जेष्ठ नेते आदरणीय श्री.अरुणसाहेब तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंगगाथा लिहीण्याचे अनमोल कार्य संत शिरोमनी जगनाडे महाराजांनी केले आहे. हि गाथा वारकरी सांप्रादायाचा आत्मा आहे
अहमदनगर - तेली समाजाचे अर्धयु संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. यानिमित्त नगर शहर विविध सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अहमदनगर महानगर पालिका कार्यालयात प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. महापौर सौ रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते हे प्रतिमापूजन झाले.