श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संताजी सेवा मंडळ सिंहगड परीसर धायरी फाटा पुणे च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी जास्तीतजास्त समाज बांधव नी रक्तदान करून श्री संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्यस्मरण करूया आपण ही करा व आपल्या जवळचे ओळखीचे नातेवाईक
नाशिक :नविन नाशिक तेली समाजाच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३३४ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा साजरा करण्यात आला. पुण्यतिथीचे औचित्य साधून नवीन नाशिकमधील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
जुन्नर, पुणे :- तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत तुकाराम महाराजांचे ग्रंथ लेखक संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी सोहळा नारायणगाव शहरात श्री लक्ष्मीनारायण मंदिरात भव्य दिव्य स्वरूपात साजरा झाला, सकाळी सहा वाजता मंदिरात जगनाडे महाराजांना अभिषेक करून महाआरती करण्यात आली.
तेली युवा आघाडीच्या वतीने तेलीखुंट येथे "संत श्री संताजी महाराज चौक" या फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जयजयकार व जयघोष करण्यात आला. याप्रसंगी युवा आघाडीचे अध्यक्ष गणेश धारक, अनिल देवराव, गणेश म्हस्के, उमाकांत डोळसे, शुभम भोत, नागेश भागवत, दिपक शेलार, उमेश काळे, सागर भगत,
श्री संताजी नागरी पतसंस्थेच्या वतीने डाळमंडई येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पतसंस्थेचे चेअरमन सौ.मीराताई डोळसे,व्हाईस चेअरमन सिंधुताई शिंदे,संचालिका जयश्रीताई धारक,रेखाताई घोडके,मेघाताई म्हस्के,श्रीमती अलका डोळसे या महिला संचालकांच्या वतीने बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले.