श्री संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने शेगाव येथे नुकतेच तेली समाजाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कॅट संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष तसेच चेलीपुरा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कचरू वेळंजकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
शिरपूर - खान्देश तेली समाज मंडळ शिरपूर तालुका कार्यकारणीच्या वतीने शिरपूर तालुक्यातील तेली समाजाची खाणेसुमारी करून त्याची जनसंपर्क पुस्तिका तयार करण्यात आली असून त्या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता संताजी चौक, चौधरी गल्ली, शिरपूर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने स्व. ग. द. आंबेकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते दिलीप खोंड यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सचिन भाऊ अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
दाबली धांदरणे: येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी, धुळेच्या वतीने विद्यार्थिनींना पी.टी. ड्रेस वाटप करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर तेली समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा रविवारी मातोश्री लॉनवर स्व. देवीदास बाबुराव साबणे नगरी येथे उत्साहात संपन्न झाला. खा. संदीपान भुमरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे होते.