सातारा तेली समाजाची संघटनात्मक वाटचाल सन 1920 पासुनची. - मोहन देशमाने

    सातारा या जिल्ह्याची एक एैतिहासिक परंपरा आहे. जरूर या परिसरात समाज अल्प आहे. जरूर येथे गरिबीचे लढाई लढणारे 90 टक्के समाज आहे. हे ही मान्य आहे. आगदी फार पुर्वी पासुन या ठिकाणी तिळवण व लिंगायत या पोटशाखा आपल्या अंतर्गत विवाह करतील तेल गाळप व उत्पादक म्हणुन ही मंडळी एकत्र येत होती. शाखेशी भांडणे नाहीत परंतु प्रत्येक शाखेत मते होती काही प्रमाणात भेद ही होते. हे जास्ती जास्त लग्न समारंभाबाबत या बाबत सुज्ञ व जाणते बांधवांनी वेळोवेळी समाजीक जाणीवेतून प्रयत्न केले. या परिसराचे वैशिष्ठ असे की दोन्ही शाखेत एक समान दुवा आहे. या परिसरात जन्मा पासुन मरे पर्यंतु जे विधी होतात हे सर्व विधी ब्राह्मणा द्वारे नव्हे तर जंगम कडून आज ही होतो. ब्राह्मणाने केलेले विधी मान्य नाहीत. जेंव्हा हा या परिसरात तेल गाळप ही प्रक्रिया बैलघाण्याद्वारे होत होती. तेव्हा प्रत्येक सोमवारी घाणा बंद आसे. महादेव हाया परिसराचा सर्वश्रेष्ठ देव. यातुन एकस्पष्ट शैवपंथ वैष्णव सरळ सरळ भेद होते. या मध्ये हा परिसर शैव पंथ अभिमानाने संभाळत होता. भस्म हे त्याचे प्रतिक आज ही या परिसराची साठवण आहे.

    शाखा होत्या काही शाखा अंतर्गत मतभेद ही होते परंतू शैव या विचाराने ते एकत्र येत होते. नाते संबंधा मध्ये कात्रजचा डोंगर व कराडची शिव ओलंडायची नाही ही परंपरा ही होती. त्यामुळे आज जुने नाते संबध याच परिघा बाहेर गेले नाहीत. हे वास्तव जरी असले तरी याच भुमीने महाराष्ट्राचा इतिहास नव्या स्वरूपात तयार केला, लिहीला, प्रसिद्ध केला आणि घडवला सुद्धा  हे मात्र आज सर्वत्र विसरले गेलेत. हे वास्तव मी काही प्रमाणात उजेडात ही आणले. 1920 च्या दरम्यान मुंबई येथून श्री. संत संताजी पुण्यतिथी सुदूंबरे येथे होऊ लागली आगदी या वेळी आपण तेली एक आहोत. आपली एक ओळख आहे. ही ओळख संघटनेच्या बळावर निर्माण करू शकतो ही जाणीव वाई येथील कै. विश्‍वनाथ चिंचकर यांना झाली. पुणे येथिल गंज पेठेत त्यांचे चिरंजीव एका छोट्या खोलित मुक्कामाला असताना त्यांनी त्याकाळातील लिखीत इतिहासात प्रसिद्ध स्वरूपात मी प्रत्यक्ष पाहीले आहे. त्यांनी त्याकाळात शिळा प्रेसवर तेली समाचार नावाचे मासिक सुर केल होते. या मासिका साठी ते महाराष्ट्रभर फिरले प्रत्येक शहरात गावात मतभेदाची दरी त्यांनी अनुभवली ती कमी करण्याचा पत्रव्यवहार  ही मी पाहिला आहे. समाज संघटीत करण्यासाठी 1922 च्या दरम्यान वाई सारख्या छोट्या शहरात तेली परिषद नव्हे तर आशा 3/4 परिषद त्यांनी भरवल्या. या मध्ये जिल्ह्यात ही संघटनेचे बी रजु लागले. त्यावेळी संघटनात्मक बांधणी झाली होती त्याची काही कागद पत्रे ही त्या वेळी मी पाहिलीत याचा अर्थ एकच महाराष्ट्रात समाज संघटनेची सुरवात प्रथम सातारा जिल्ह्यातच सुरू झाली होती.

    स्वातंत्र्य पुर्व काळात तेल उत्पादक असलेल्या समाजा साठी सहकारी संस्था कै. रामभाऊ मेरूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू  झाली. परंतु जस जसे शेंग पिक कमी होऊ लागले तस तसे गाळप कमी झालेव हि सुद्धा संस्था बंद झाली. या वेळी कै. रामभाऊ मेरूकर, कै. सिताराम शेडगे, कै. माधवराव धोत्रे, कै. अ‍ॅड. बारावडे कै. केशवराव विरकर, वसंतराव देशमाने यांनी सातारा जिल्हा समस्त तेली समाज या नावे ंघटनात्मक बांधणी सुरू केली होती या साठी लिंगायत तेली अंतरगत असलेले मिरजेव तुळजापूर तेली बांधवव तिळवण तेली अंतर्गत असलेल्या समाज बांधवांचे दोनही प्रवाह एकत्र केले होते. पंरतु मेरूकर, शेडगे, विरकर, बोरवडे ही मंडळी एक तर वयोवृद्ध होऊ लागली यांनी या धडपडीला मर्यादा येऊ लागल्या.

    याच दरम्यान समाजात संघटनेची एक पोकळी निर्माण झाली. या विचार प्रक्रिये प्रमाणे संघटनात्मक बांधनी साठी सर्व एकत्र आले व सातारा जिल्हा समाज तेली समाज संघ या नावाने संस्था रजिस्ट्रेशन साठी प्रयत्न व सहविचार सभा जिल्हाभर सुरू झाल्या. या वेळी श्री. किशोर मेरूकर यांनी पुर्ण सहकार्य दिले. कारण कै. रामभाऊ मेरूकर यांच्यामुुळे एक वेगळी दिशा त्यांच्याकडे होती. त्यामुळे सवता सुभा मत भेद न करता संघटना हे महत्वाचे ही श्री. मेरूकर यांची विचार प्रणाली या ठिकाणी प्रभावी ठरली. व श्री गजानन दळवी हे सातारा जिल्हा समस्त तेली संघटनेचे अध्यक्ष झाले. संघटना समाजाच्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येकघरात नेहण्यासाठी सन 1999 मध्ये प्रयत्न सुर झाले. साठी गावा गावातमिटींग घेऊन समाज संघटनेचे महत्व दिले. प्रत्येक ठिकाणी विचाराचे वगवेगळे प्रभाव होते. त्या प्रभावांना गोंजरत सर्वांचा एकच प्रभाव म्हणजे समाज संघटन हे पटले व संघटन उभे राहिले. सातारा येथिल तेली बांधवांची समाधी सातारा लगत असलेल्या अरफळ गावातील काळोजी महाराज समाधी स्थळी सर्वांनी एकत्र येऊन भंडारा नियमीत दरवर्षी सुरू केला. याच काळात वधु-वर मेळावा ही प्रणाली पुढे आली संघटनेचे काम, समाजाला एकत्र आणण्याची गरज यातुनच वधु-वर मेळावा ही संकल्पना समोर आली. यासाठी सुरवातीला प्रयत्न करुन मेळावा संकल्पना प्रत्यक्ष रित्या यशस्वी केली. श्री. गजानन दळवी हे सन 1999 ते 2009 या काळात समाज अध्यक्ष होते.

    सन 2009 ते सन 2011 याकाळात श्री. सुरेश किर्वे जिल्हा अध्यक्ष होते या काळा मध्ये ते कार्य करित असताना प्रथम श्री संत संताजी महाराज पालखी सोहळ्याचा विचार मांडला सुदूंबरे येथून पंढरपूरकडे वाटचाल करिताना निरा नदी ओलांडून सातारा जिल्ह्यातुन प्रवास करते. या पालखीचे आपण संस्थे च्या वतीने स्वागत करावयाचे ठरविले व पालखीचे भव्य स्वागत ही केले. वधुवर मेळाव्यास जी सुरूवात झाली होती त्या मेळाव्याला राज्यस्तरीय करण्यासाठी प्रयत्न सुर झाले आणि तसा यशस्वी प्रयत्न ही केला. समाजासाठी एक वास्तु असावी त्या साठी जागा असावी ही प्रणाली रुज लागली.

    श्री. अनिल भोज हे व्यवसायाने विमा एजंट असल्याने जन संपर्क मोठा त्यात संघटनेचे महत्व समजलेले विठ्ठलवाडी ता. कोरेगाव येथे श्री. संत संताजी पुण्यतीथी साजरी करण्यास पुढाकार होता. सन 1999 पासुन संघटना बांधुन संस्था उभारण्यात सहभाग. सन 2011 ते 2015 ह्या काळात संस्था अध्यक्ष म्हणुन काम कले. मोठ्या प्रमाणात काळोजी महाराज पुण्यतिथी साजरी करणे. लोणंद येथे श्री संत संताजी महाराज पालखीचे स्वागत करणे विठ्ठलवाडी येथे संताजी महाराज पुण्यतिथी साजरी करणे सातरा येथे राज्स्तरीय वधु-वर मेळावे संस्थे तर्फे भरविणे संस्थेला जागा खरेदी साठी गंगाजळी वाढविणे हि वाटचाल केली. ऑगष्ट 2015 पासुन श्री. अनिल क्षिरसागर समाज अध्यक्ष म्हणुन काम पहात आहेत.

    सातारा येथिल तेली बाबांचा उत्सव, अरफळ येथिल काळुजी महाराज पुण्यतिथी बरोबर विठ्ठलवाडी वाई, भुईंज, शिरवळ, कुडाळ येथे श्री संत संताजी पुण्यतिथी साजरी होते. कुडाळ, ता. जावळी येथे शामराव किर्वे यांच्या नेतृत्वा खाली जिल्ह्यातील पहिले श्री. संत संताजी मंदिर उभे राहिले आहे. शिरवळ ता. खंडाळा येथे श्री. ज्ञानेर्‍वर दाभोळे सौ. सुरेखा हाडके यांच्या नेतृत्वाखाली बर्‍या पैकी संघटन असुन इथे समाज वास्तु असुन विशेष बाब हाडके ताई दरवर्षी महिलांच्या नेतृत्वा खाली उत्सव साजरे करतात.

    सातारा येथे मल्हार पेठेत तेली बाबांचा मठ आहे. या मठाच्या जिर्णाद्धारा साठी श्री. राजमाने यांनी प्रयत्न केले आहेत. कराड येथे सर्वश्री दत्तात्रय तारळेकर प्रा. सुहास शिवडेकर, प्रकाश घोडके, अरण बोडके, सत्यराज दळवी, प्रा. महालिंग मुंडेकर, श्री. शंकर स्वामी, श्री. संभाजी फल्ले यांच्या नेतृतवा खाली सन 2011 मध्ये समाज सर्वे करुन त्याची पुस्तीका प्रसिद्ध केली आहे. यातुन संघटना मजबुत करून  सामाजीक प्रश्‍न सोडवणे व श्री बसवेश्‍वर जयंती साजरी करणे. अर्थिक प्रश्‍न सोडविण्या साठी शिवशंकर नागरी सं. पंत संस्था कार्यरथ आहेत या संस्थेत शरद गौरीशंकर, मुंडेकर यांच्या नेतृत्वा खाली समाज कार्यरथ आहे.

दिनांक 28-11-2015 23:07:57
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in