अहमदनगर - सर्व तिळवण तेली समाज बांधवांच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी उत्सव रविवार दि. 17/12/2017 रोजी सकाळी ठिक 7.00 वाजता श्री विठ्ठल मंदीर, मेन रोड, जामखेड येथे अयोजीत केला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी सहपरीवार उपस्थित रहावे ही विनंती.
संताजी जगनाडे महाराजांनी दिली कर्तव्याची शिकवण उपदेशांवर समाजोत्थानाचे कार्य सुरू
नागपूर : संताजींचा विवाह बाराव्या वर्षी झाला. संसार करतानाही त्यांचे मन मात्र योग्य गुरूसाठी तळमळत होते. दोन अपत्य झाल्यावर एका कीर्तनाच्या निमित्ताने त्यांची संत तुकाराम महाराजांशी भेट झाली. संत तुकारामांचे ते शिष्य झाले. महाराजांच्या १४ टाळकर्यांमध्ये संताजी प्रमुख होते.
नागपुर तेली समाजातील नागरिकांना एकत्रित करून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी महासभा कार्यरत आहे. विविध उपक्रम, व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधन करणे आणि समाजाची उन्नती साधण्यासाठी महासभा काम करीत आहे. यात रामदास तडस, कृष्णा हिंगणीकर, ईश्वर बाळबुधे, सतीश देऊळकर कार्य करीत आहेत.
नागपुर नंदनवन येथे संत जगनाडे महाराज यांचे स्मारक तयार करण्यात आले. संताजींचे कार्य आणि उपदेश सातत्याने समाजाच्या समोर राहावा आणि त्यांच्या विचारांवर जगण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून या स्मारकाची निर्मिती करण्यात आली. विठ्ठलराव खोब्रागडे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा तयार करण्यात आला आहे. संताजींच्या हातात लेखणी आहे आणि ते लिहित असल्याचे दृश्य साकारणारा हा पुतळा संपूर्ण भारतात एकमेव आहे.
नागपुर तेली समाज जवाहर विद्यार्थी गृहाच्यावतीने या महिला मंचाची स्थापना करण्यात आली. महिलांमधील कलागुणांना प्रोत्साहन आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य मंचद्वारे करण्यात येते. विविध स्पर्धा, उपक्रम, व्याख्यानमाला, शिबिरे आदींचे आयोजन मंचतर्फे करण्यात येते.