राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा पिंपरी चिंचवड पुणे 2017
गुरूवार दि. 2 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 ते सायं 6 वाजेपर्यंत
मेळाव्याचे ठिकाण -
शहीद फ्लाईंग ऑफीसर समीर काशिनाथ नेरकर नगर, वैकुंठवासी ह.भ.प. माधवराव बबनराव अंबिके सभागृह
शुभम गार्डन,
वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे - 411033
संपर्क कार्यालय व फार्म स्विकारण्याचा पत्ता
संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड
द्वारा - प्रदिप सायकर, सायकर प्लाझा, नगर अर्बन बँकेच्या खाली, चिंचवडगांव, पुणे 33
संपर्क 9156586402
या एैतिहासिक पुण्यात तेली समाजाचा वेगळा ठसा आहे. मग तो कला, क्रिडा, समाजकारण या विविध क्षेत्रात उमटविलेला आहे. स्वातंत्र्य पुर्व काळात, भगत, कर्पे यांनी स्वबळावर नगराध्यक्ष पद भुषविले आहे. रावसाहेब केदारी, रावसाहेब पन्हाळे यांनी समाजकारण व व्यवसायीक प्रगती मुळे रावसाहेब ही शासकीय पदवी मिळवली आहे. सर्कस वाले शेलार यांनी शेलार सर्कस जागतीक पातळीवर पोहचवली होती.
पुणे जिल्ह्यातील डोंगर दर्यातील अंबेगाव हे पन्हाळे कुटूंबाचे मुळ गाव हे घराने जन्माने तेली पण गावात ठसा उमटवून होते. मी तेली आहे. मी यातीहिन आहे याची जाणीव कुठेच नव्हती गावातील देवळांना उजेडात ठेवण्याची जबाबदारी पन्हाळे कुटूंबावर होती जो देव सर्वांची संकटे दूर करतो. जो देव मानवांना प्रकाशमान करतो त्याच देवाला अंधारातुन प्रकाशात ठेवण्याचे काम पन्हाळ्यांच्या कडे होते.
- रमेश भोज, मा. विश्वस्त तेली समाज पुणे व ओबीसी सेवा सं, पुणे जि. अध्यक्ष
श्री. आबा बागुल यांचा माझा परिचय तेली समाजाचा विश्वस्त म्हणुन झाला. त्यांची कार्यपद्धती जवळुन पहाता आली. उच्च पदावर जावून सुद्धा तुम्ही माझे अहात मी तुमचा आहे. ही भुमीका ते घेऊन वावरताना पहाता आले. कोथरूड समाज संस्था माध्यमातुन अनेक उपक्रम राबविताना श्री. आबांच्या संपर्कात रहाता आले. समाज उपयोगी कामात त्यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.
चांदवड :- शहरातील तेली समाज ट्रस्टच्या वतीने बांधण्यात आलेल्या संताजी संकुलाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि. 13) सायंकाळी 7 वाजता होणार आहे. राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण होणार असून, यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.