श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे या संस्थेची स्थापना १०० वर्षापुर्वीची आहे. संस्थेच्या वतीने दर वर्षी गरीब विद्यार्थ्यांना रू. १०००/ - शिष्यवृत्ती दिली जात होती. मागील दहा बारा वर्षात शिष्यवृत्ती योजना बंद करण्यात आली होती.
संस्थेच्या वतीने सन २०१५ - २०१६ या शैक्षणिक वर्षापासुन शिष्यवृत्ती योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे. इयत्ता ११ वी ते पदवीपर्यत शिक्षण घेत असलेल्या तेली समाजातील गरीब विद्यार्थ्यांना रू. १०००/ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या नमुन्यातील अर्ज भरून त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदरचा अर्ज ३१ जुर्ल २०१५ पर्यंत खालील पत्यावर पाठविण्यात यावा.
मे. अमोल कंस्ट्रक्शन, द्वारा, श्री. बाळासाहेब शेलार, पी.एम.टी. चौक, भोसरी, पुणे ३९, मो. नं. ९९२२५०१०१०
तसेच या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने समाज बांधवांनी या उपक्रमात भरीव आर्थिक मदत द्यावी आसे आव्हान संस्थेचे अध्यक्ष श्री. जनार्दन जगनाडे यांनी केले आहे.