वडगाव मावळ : शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील संत संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधिस्थळ मंदिर विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. दरम्यान, माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी यासाठी भरीव निधीची मागणी केली होती. सरकारने निधी जाहीर केल्याने भेगडे यांच्या मागणीला यश आल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
संत जगनाडे महाराज यांचे जन्मस्थळ श्री क्षेत्र सुदुंबरे येथे असून, त्यांच्या स्मारकाला भरघोस निधी मिळावा यासाठी नागपूर येथे तेली समाजाच्या दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आग्रही मागणी केली होती. आज उपमुख्यमंत्री महोदयांनी स्मारकासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
धुळे - संपूर्ण खान्देशातील तेली समाजामध्ये नावलौकिक प्राप्त असलेल्या खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या पदाधिकारींनी आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिनाचे दिवशी मुलींना जन्म देणाऱ्या मातांचा सत्कार करून एक अभिनव उपक्रम राबवला व आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील बंधू - भगिनींना कळविण्यात येत आहे की, यंदा ज्यांना "कर्तव्य" आहे अशा इच्छुकांकरिता समाजातील जेष्ठांच्या आशिर्वादाने अनुरूप जोडीदार शोधण्यासाठी राज्यस्तरीय वधूवर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे,
मौदा, तालुक्यातील अरोली येथील सामाजिक कार्यकर्त्या कामिनी प्रल्हाद हटवार यांची संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेच्या तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती संस्थापक सचिव अजय थोपटे, संघटक प्रमुख गजानन तळवेकर, कार्याध्यक्ष संगीता तलमले यांनी केली.