जुन्नर, पुणे :- तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत तुकाराम महाराजांचे ग्रंथ लेखक संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी सोहळा नारायणगाव शहरात श्री लक्ष्मीनारायण मंदिरात भव्य दिव्य स्वरूपात साजरा झाला, सकाळी सहा वाजता मंदिरात जगनाडे महाराजांना अभिषेक करून महाआरती करण्यात आली.
चंद्रपूर - तेली समाज संघटनात्मदृष्ट्या मोठा आहे. त्यामुळे तेली समाजबांधव सद्धा मोठा झाला पाहिजे. समाजाला जोडायचे असेल तर तेली समाजाचे एकत्रीकरण करणे महत्त्वाचे आहे. राजकारणामध्येही समाजबांधवांना पाठिंबा दिला पाहिजे, असे मत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी व्यक्त केले.
श्री संताजी नागरी पतसंस्थेच्या वतीने डाळमंडई येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पतसंस्थेचे चेअरमन सौ.मीराताई डोळसे,व्हाईस चेअरमन सिंधुताई शिंदे,संचालिका जयश्रीताई धारक,रेखाताई घोडके,मेघाताई म्हस्के,श्रीमती अलका डोळसे या महिला संचालकांच्या वतीने बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले.
नगर - श्री संत संताजी जगनाडे महाराज यांनी जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची बुडालेली गाथाचे स्मरण करुन पुन्हा लेखन केले.अभंग व गाथा अमर केली.संताजी महाराजांचे देहावसन झाले असता. श्री संत तुकाराम महाराजांनी दिले वचन पाळुन पृथ्वीवर पुन्हा वैकुंठातून आगमन केले.व त्यांना मुठमाती दिली. असे गुरु शिष्याचे श्रेष्ठ नाते होते.
चांदवड शहरात तेली समाजाच्या वतीने जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या मुळगाथाचे लेखनकर्ते श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३३४ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन त्यांच्या प्रतिमेस ह.भ.प श्री.दत्तात्रय काका राऊत व श्री.अशोक काका व्यवहारे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी श्री.संदीपजी महाले सर यांनी संताजी महाराज्यांच्या जीवनावर माहिती दिली