Sant Santaji Maharaj Jagnade
नागपूर, २०२५: जवाहर विद्यार्थिगृह, नागपूर येथील त्रैवार्षिक निवडणुकीत संताजी विकास पॅनलने घवघवीत यश मिळवले असून, पुरोगामी पॅनलचा पराभव झाला आहे. या चुरशीच्या निवडणुकीत संताजी विकास पॅनलचे १७ उमेदवार विजयी झाले, तर पुरोगामी पॅनलचे केवळ दोन उमेदवारांना यश मिळाले.
पिंपरी-चिंचवड: तेली समाजाने हुंडा प्रथा आणि लग्नातील अनिष्ट प्रथांना मुळापासून उच्चाटन करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. संताजी सेवा प्रतिष्ठान आणि प्रदेश तेली महासंघाच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर चौकात तेली समाजबांधवांनी एकत्र येऊन हुंडाविरोधी शपथ घेतली.
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपुर)
श्री. क्षेत्र सुदुंबरे मिती ज्येष्ठ ॥7॥ बुधवार दि. 18/06/2025 ते श्रीक्षेत्र पंढरपुर आषाढ शु. ॥15॥ गुरूवार दि. 10/07/2025
नागपूर: संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा आणि संताजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान करत त्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबवला गेला.
श्री संताजी नवयुवक मंडळाच्या वतीने शेगाव येथे नुकतेच तेली समाजाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कॅट संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष तसेच चेलीपुरा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कचरू वेळंजकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.