श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे : आज रविवार दिनांक 28.1.2018 रोजी सदुंबरे येथे संस्थानचे अध्यक्ष मा.शिवदासशेठ ऊबाळे यांच्या अध्यक्षते खाली संस्थानची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभेसाठी विविध जिल्हयातून 50 हून अधिक समाज बांधव व भगीनी ऊपस्थीत होते.
श्री. शांताराम गोपाळ देशमाने, संस्थापक अध्यक्ष , सांगली, जिल्हा तेली, समाज, पेठ
आदरनीय भगवान बागुल सरांनी आपले विचार व्यक्त करण्यास सुचीत केल्यावरुन मी सांगली, सातारा, कोल्हापुर इ.जिल्हयातील तेली समातातील विवाह समस्या बाबत स्पष्टता करत आहे.
हवेली तालुक्यातील शिवापूरच्या सरपंचपदी शारदा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापुर्वीच्या सरपंचानी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे सरपंच पदासाठी निेवडणूक झाली.
औरंगाबाद : जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिरात औरंगाबाद जिल्हा तेली समाजातर्फे नुकताच तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला. खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तअण्णा क्षीरसागर हे होते.
महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलीक महासभा याच्या सुचनेप्रमाणे महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके व गावपातळीवर तेली समाजाचे संघटन करण्याचे नियोजीत करण्यात आले आहे. यानुसार रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या दि.२५/०२/२०१८ रोजीच्या जिल्हा कार्यकारणीत ठरल्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील युवक, युवती व महिला यांच्या तालुकास्तरावर समित्या प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.