उस्मानाबाद-आज दि.६ रोजी शासकिय विश्रामगृह येथे तेली समाजाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यातिथी साजरी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.हि पुण्यातिथी प्रथम वर्ष असल्या कारणाने श्री मुकुंद कोरे महाराज यांच्या निवास्थानी करण्याचे ठरले.संताजी जगनाडे महाराजांच्या दि.१५ रोजी पुण्यातिथी दिवशी मुकबधीर अपंग मुलांना खाऊ वाटप करण्याचे व गरजु विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.
श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी चंद्रपूर तेली समाज आयोजित
दिनांक शनिवार 16 डिसेंबर 2016 ला वेळ दुपारी 3.00 वा.
स्थळ - श्री हनुमान मंदीर, जटपूरा पंच तेली समाज, जटपूरा वार्ड, चंद्रपूर
सर्व तेली समाज बांधवाना विनंती करण्यात येते की, तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम बुधवार दि. 13 डिसेंबर ते शनिवार दि. 16 डिसेंबर 2017 पर्यंत करण्यात येत आहे. तरी समाज बांधवानी सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे, ही विनंती.
अमरावती दि.26:11:2017 रोजी पहील्यांदाच, अमरावती तिवसा शहरात तेली समाज मिलन मेळावा आयोजीत केला होता. या कार्यक्रमासाठी तिवसा शहरातील संपूर्ण तेली बांधवांनी उपस्थिति दाखवुन संपुर्न कार्यकर्त्यांच मन जिंकले होते. या कार्यक्रमासाठी तेली सामाजातील दिग्गज लोकांनी उपस्थिति दाखवीली त्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे.
श्री संत संताजी महाराज जयंती सोहळा दि. 8 डिसेंबर 2017 शुक्रवार रोजी आयोजीत करण़्यात आला आहे. तरी सर्व तेली समाज बांधवानी सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी हि विनंती.
विनित सर्व समाज बांधव नांदेड
स्थळ श्री विठ्ठल रूक्मीणी मंदिर, भोईगल्ली नावघाट रोड, नांदेड
वेळ सकाळी 9.30 वा. दि. 8 डिसेंबर 2017
ज्ञानगुरू जगतगुरू श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त होणार्या कार्यक्रम संताजी जगणाडे महाराज चौक ग्रेट नाग रोड नंदनवन पुर्व नागपूर येथे आयोजित केलेल आहे तरीही नागपूर शहरातील समस्त तेली समाज बांधवांना विनंती आहे. की येत्या ८ तारखेला सहपरिवार आवर्जुन उपस्थित राहावे वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत