Sant Santaji Maharaj Jagnade
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 7) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
पुलगाव येथिल बाजार समीतीच्या सदस्य होऊन केली सुरूवात. नगराध्यक्ष, आमदार, खासदार या प्रवासात चढउतार हे खेळाडु वृत्ती असल्याने ते पुन्हा गरूड भारारी घेत आसतात. तेली समाज ही एक ताकद आहे. ती ताकद ओळखून ते समाजात गेले. एक आमदार एक खासदार आपल्या जवळ येतात. सुख दु:खाची पाठराखण करतात. सामाजीक प्रश्न समजुन घेतात. सामाजीक प्रश्नाची जाण ठेवतात.
ठाणे ही सांस्कृतिक नगरी आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक संस्था, मुंडळे आपआपल्या परीने स्वागताच्या जय्यत तयारीला लागले आहेत. मात्र यंदा ठाण्यातील प्रतिष्ठीत पाच संस्था एकत्र येऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणार आहेत. यावर्षी संताजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यातील अलिखीत कराराच्या चलचित्राचा रथ तयार करणार आहेत.
ठाण्यात यंदा ठाणे महानगर तेली समाज ठाणे, श्री संताजी सहायक संघ ठाणे, श्री. संताजी तेली समाज उत्कर्ष मंडळ मुंब्रा., रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्था ठाणे मंचद्वारे संयुक्तरीत्या स्वागतयात्रा काढणार आहेत. मागील वर्षी संताजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या अभंग लिहिण्याचे काम हे संताजी महाराज यांनी केले., तेच संत तुकाराम महाराज यांचे अभंग व संताजी महाराजांनी लिहिलेल अभंग चित्ररथात ठेवण्यात आले होते व त्यापासुन वारकरीपंथाला अवगत करून देण्यात आले होत.
महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणा या प्रदेशात तेली आणि इतर समाजात भरपुर जणान कडे पाटीलकी आहे. या पदाचा आणि जातीचा काही ही संबंध नाही.
बऱ्याच जणांना 'पाटील' या अधिकारपदाची सुरुवात शिवरायांनी केली, असे वाटते. सत्य इतिहास असा नसून 'पाटील' हे पद शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून अस्तित्वात होते. शिवरायांचे पणजोबा बाबाजी भोसले हे वेरूळ गावचे पाटील होते. मुळात 'पाटील' या पदाचा उगम सातवाहन काळात झालेला दिसतो. सातवाहनांच्या काळात सातवाहन राजांनी महसूल वसुलीसाठी 'पट्टखील' हे पद निर्माण केले होते.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 6) - मोहन देशमाने
पुन्हा एक वेळ विठ्ठलाच्या पयरीवरचा समन्वय मी मांडतोय. या एैतिहासिक ठेवा विसरला म्हणुन आपण जाळ्यात अडकलो डॉ. धावडे यांच्या संशोधना नुसार या देशाच्या कर्ती माणसे बौद्ध धर्माची होती. तेली समता व बंधुभाव घेऊन अनेक देशात गेली. ती समता त्यांनी परक्या देशात पेरली व त्यांनी पेरलेली समता सिलोन तिबेट, ब्रह्मदेशात आज ही सतेज रूपाने आहे. शंकराचार्यंच्या काळात समन्वय झाला आणि या समन्वयातुन काही वर्षात आम्ही सांगतो तोच धर्म. आम्ही सांगतो तेच शास्त्र आम्ही सांगतो तोच देव. आम्ही कोण तर आम्ही देवाचे बाप आहोत. ही गुर्मी आपल्या पुर्वजांचे जीवन माती मोल करणारी विकृतीलाच संस्कृती मानत होतो. तीला पायदळी तुडवताना संत नामदेवांनी विठ्ठल निवडला या वेळी विठ्ठल शिव विचाराचा होता.
(तेली गल्ली प्रतिनिधी) चाकण :- ठाणे येथील तेली समाजाचे जाणते बांधव श्री. मुकुंद चौधरी यांची निवड श्री. संत संताजी महाराज तेली संस्था सुदंबरे या संस्थेच्या मुंबई विभागीय अध्यक्ष पदी नुकतीच निवड झाली आहे. संस्था अध्यक्ष श्री. जर्नार्दन गोपाळशेठ जगनाडे यांनी त्यांना नियुक्तीचे नुकतेच पत्र दिले आहे. संस्थेचा विस्तार होण्यासाठी संस्था महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करित आहे.