Sant Santaji Maharaj Jagnade
संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून सर्व समाज कार्य ज्यांनी केले असे महाराष्ट्राचे थोर संत आराध्य दैवत संत श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तसेच भगूर नगरपरिषद मध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी भगूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनिता ताई करंजकर,
आज संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूर प्रांतिक तेली समाजाच्या वतीने अमोल बाल संस्कार लातूर येथे जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लातूर जिल्हा प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ खडके सचिव उमाकांत राउत तसेच प्रा.शिवराज भुजबळ, उमाकांत फेसगाळे, संजय ऊदगीरे, हणमंत तेली,रमाकांत देशमाने, विवेकानंद क्षीरसागर,
पुणे तिळवण तेली समाजाच्यावतीने आज संत शिरोमणी संताजी महाराज जयंतीनिमित्त भवानीपेठ कार्यालय ते पुणे महानगरपालिका येथेपर्यंत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दुचाकी रॅलीमध्ये सर्व पुणे शहरातील समाजबांधव एकत्रित जमा झाले. रॅली रामोशीगेट, मॉर्डन चौक, नानापेठ, लक्ष्मी रोड, पवळे चौक, कुंभारवाडा, शनिवार वाडा मार्गे पुणे महानगरपालिका येथे पोहचली.
आज इंदिरा नागरी पत संस्था झंजावात बिल्डिंग मद्धे कर्मचारी संघटनेच्या वतीने श्री संताजी महाराज जगनाडे यांची 396 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन समाजातील जेष्ट श्री रामदास भाऊ देव्हडे, श्री हिंगे सर यांनी केले. सूत्र संचालन कर्मचारी संघटनेचे माझी अध्यक्ष श्री सुभाष भाऊ डोम्बळे सर तर आभार प्रदर्शन श्री जाधव सर यानी केले. कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी समाजातील जेष्ठ श्री वाडेकर साहेब
जगत गुरु तुकोबाराय यांचे पटशिष्य संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतनिमित्त कळंबमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबादचे खासदार श्री.ओमराजे निंबाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद- कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.कैलास घाडगे पाटील उपस्थित होते.