वर्धा: शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये थोर संत, व्यक्ती यांची जयंती साजरी करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाने सुची तयार केलेली आहे. या सुचीमध्ये प्रथमच संत जगनाडे महाराज यांची जयंती 08 डिसेंबर 2019 रोजी साजरी करण्याला तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांनी मान्यता दिल्याने या वर्षीपासून संत जगनाडे महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे साजरी करण्यात येणार आहे.
किल्ले धारुर येथील नगर परिषद येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज याची जयंती साजरी करताना किल्ले धारुर नगरीचे नगराध्यक्ष आदरनीय डाॕ. स्वरूप सिंह हजारी साहेब नगरसेवक बाळासाहेब सोनटटक्के नागनाथ सोनटक्के सोमनाथ भालेराव माहारुद्र ईःगळे सर दत्ताबोरगावकर जगन्नाथ सोनटक्के गंगाधरशिंदे ज्ञानेश्वर शिंदे बालासाहेब बोरगावकर
संत तुकाराम महाराजांच्या खांद्याला खांदा लावून सर्व समाज कार्य ज्यांनी केले असे महाराष्ट्राचे थोर संत आराध्य दैवत संत श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती ८ डिसेंबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तसेच भगूर नगरपरिषद मध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी भगूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनिता ताई करंजकर,
आज संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूर प्रांतिक तेली समाजाच्या वतीने अमोल बाल संस्कार लातूर येथे जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लातूर जिल्हा प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ खडके सचिव उमाकांत राउत तसेच प्रा.शिवराज भुजबळ, उमाकांत फेसगाळे, संजय ऊदगीरे, हणमंत तेली,रमाकांत देशमाने, विवेकानंद क्षीरसागर,
पुणे तिळवण तेली समाजाच्यावतीने आज संत शिरोमणी संताजी महाराज जयंतीनिमित्त भवानीपेठ कार्यालय ते पुणे महानगरपालिका येथेपर्यंत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या दुचाकी रॅलीमध्ये सर्व पुणे शहरातील समाजबांधव एकत्रित जमा झाले. रॅली रामोशीगेट, मॉर्डन चौक, नानापेठ, लक्ष्मी रोड, पवळे चौक, कुंभारवाडा, शनिवार वाडा मार्गे पुणे महानगरपालिका येथे पोहचली.