चंद्रपूर ब्रम्हपुरी दि. ११ - महाराष्ट्र राज्यातील तेली समाजाचा भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेच्या वतीने १९ डिसेंबरला यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे सकाळी १० वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे यात तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तेली समाजाच्या एकतेची ताकत दाखवावी असे आवाहन चंद्रपूर जिल्हा बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे महासचिव प्रा.श्याम करंबे यांनी केले आहे.
सोयगांव येथील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यलयात राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांनी जयंती साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच शासकीय पातळीवर जयंती साजरी झाल्यामुळे तेली समाजामध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण होते. संध्याकाळी सालाबादप्रमाणे पालखी मिरवणूक काढण्यात आली.
श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सवा निमीत्य नागपूर महानगरपालिका नागपूर येथे संत जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण व माल्यार्पण नागपूर महानगरपालिका च्या उपमहापौर सौ मनीषा ताई कोठे स्थाई समिती अध्यक्ष श्री प्रदिप पोहाने यांच्या हस्ते दिनांक ८ डिसेंबर १९ छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकिय इमारत नागपूर महानगरपालिका येथे सपन्न झाला.
माणूस कर्मानेच मोठा होत असतो. कुणी स्वतःसाठी कर्म करतो. तर कुणी जगासाठी झिजतो. समाजासाठी झिजणे हेच खरे जगणे होय, असे मत ह. म. प. नागोराव भडदमकर महाराज यांनी आज यथे व्यक्त केले.
एस. एम.सी. शाळेच्या सभागृहात तेली समाज मंडळाच्यावतीने संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मडदमकर महाराज बोलत होते. ज्येष्ठ समाजबांधव प्रा. हरिभाऊ क्षिरसागर अध्यक्षस्थानी होते.
लोणावळा तेली समाज - श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती लोणावळा नगर परिषदेत प्रतिमा पूजन करून साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी प्रतिमा पूजन केले तर उपनगराध्यक्ष श्रीघर पुजारी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी नगरसेवक राजाभाऊ खळदकर, माजी नगरसेविका सुमनताई होगले, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दुगुडि, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य हर्षल होगले आदी मान्यवर उपस्थित होते.