Sant Santaji Maharaj Jagnade
A WOMEN'S get-together was organised by Maratha Teli Samaj Vikas Mandal at Jaibharat Mangalam, Badnera along with haldi-kunku programme.
Shubhangi Shinde, Rajashree Borkhade, Meena Giramkar and Vijaya Bakhade were present as the chief guests. Guests inaugurated the programme by worshipping the image of Sant Jagnade Maharaj.
मराठा तेली समाज विकास मंडळ द्वारे हळदीकुंकू या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. २५/०१/२०२० जयभारत मंगलम अमरावती येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सौ.शुभांगीताई शिंदे ,सौ.राजश्रीताई बोरखडे, सौ.मिनाताई गिरमकर, सौ.विजया बाखडे उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरवातीला समाजाचे आराध्य दैवत सतांजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे महीला मंडळ द्वारे पुजन करण्यात आले.
तेली महासंघाने उचलली मागणी
नागपूर मराठा समाजाला राज्य सरकारने १६ टक्के आरक्षण जाहीर करताच आता तेली समाजानेदेखील दहा टक्के आरक्षणाची मागणी पुढे केली आहे. मराठा समाजाप्रमाणेच तेली समाजदेखील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे तेली इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास (टीईबीसी) असा नवा प्रवर्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय तेली समाज महासंघाचे मुख्य संयोजक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. -
तेली समाज मंडळ जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली
कणकवली तेली समाज उन्नती मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली यांची तर सचिवपदी चंद्रकांत तेली यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच येथील वृंदावन हॉलमध्ये झाली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, मधुकर बोर्डवकर, अप्पा तोटकेकर, आबा तेली, नंदू आरोलकर व इतर पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
आरमोरी - आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाज भरकटला जात आहे, सोसिअल मीडियाचा अधिक वापरामुळे समाजात संबंध दुरावलेले असल्याचे दिसत आहे, यामुळे समाज संघटनवर भर दिला पाहिजेत, जग नव्या तंत्रज्ञान युगात पदार्पण केले असले या तंत्रज्ञान युगात भारतीय संस्कृतीत समाज टिकला पाहिजेत, या करिता गावो गावी समाज मेळावे घेऊन समाज संघटन केले पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र तेली समाज महासंघ चे अध्यक्ष बबनराव फंड यांनी केले आहे.