मागील २३ वर्षापासुन सतत सुरू असलेला भंडारा येथे तेली समाजातील एकमेव राज्यस्तरीय 'उपवर वर-वधु परिचय मेळावा' यंदाही दि. २५ डिसेंबर २०१९ रोज बुधवारला सकाळी १० वाजेपासून श्री. संताजी मंगल कार्यालय, भंडारा येथे श्री. संताजी बहु. सेवा मंडळ, भंडारा रजि. नं. ९७४४/०३/भं. या रजिस्टर्ड संस्थेद्वारे आयोजित केलेला आहे. सदर मेळाव्याला समाजातील वरिष्ठ पाहुणे मंडळीचे मार्गदर्शन लाभणार आहे.
औरंगाबाद,(प्रतिनिधी) - अखिल भारतीय तैलीक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.कॅबिनेट मंत्री जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांच्या व कोषाध्यक्ष कृष्णरावजी हिंगणकर यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी यांनी यांनी गणेश पवार यांची निवड केली.गणेश पवार यांनी औरंगाबाद शहरात विविध सामाजिक कार्यक्रम यशस्वी करून समाज संघटनेचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
कहाड : कोल्हापूर लिंगायत तेली समाज अंतर्गत राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी हा मेळावा पार पडणार आहे, अशी माहिती समाजाचे कन्हाड शहराध्यक्ष रवींद्र मुंढेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात वीरशैव लिंगायत तेली समाज आहे.
प्रति वर्षा प्रमाणे याही वषी श्री संत संताजी महाराज जगनाठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त तिळवण तेली समाज,गावकी व पंचक्रोषीतीन भाविक मंडळीच्या सहकानि हा सोहळा संपन्न होत आहे. प्रारंभ बधुवार दिनांक 18/12/2019 तर सांगता बुधवार दि 25/12/2019 स्थळ :- श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर,बाभुळगाव रोड,लासुर स्टेशन,
अकोला जिल्हा श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त सर्व शाखीय तेली समाजाची शोभायात्रा. तेली समाज बांधवांना विनंती करण्यात आली आहे की, तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अकोला जिल्हा कार्यकारिणी वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.