Sant Santaji Maharaj Jagnade
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती बाबत शासनाने GR (शासकीय आदेश) काढला व या वर्षी सर्व शासकीय व निम शासकीय कार्यालयांना दिनांक 8 डिसेंम्बर रोजी संत श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंघाने डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे श्री तुषारभाऊ झापर्डे यांनी व आर्थिक गुन्हे शाखा येथे श्री गुड्डू भाऊ मीसुरकार यांनी संत श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी केली.
श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे, श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ जि. पुणे. मार्गशीर्ष वद्य सप्तमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी दि. 18 डिसेंबर 2019 ते 25 डिसेंबर 2019. अखंड हरिनाम सप्ताह
चंद्रपूर ब्रम्हपुरी दि. ११ - महाराष्ट्र राज्यातील तेली समाजाचा भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेच्या वतीने १९ डिसेंबरला यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे सकाळी १० वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे यात तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तेली समाजाच्या एकतेची ताकत दाखवावी असे आवाहन चंद्रपूर जिल्हा बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे महासचिव प्रा.श्याम करंबे यांनी केले आहे.
सोयगांव येथील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यलयात राष्ट्रसंत संताजी महाराज जगनाडे यांनी जयंती साजरी करण्यात आली. पहिल्यांदाच शासकीय पातळीवर जयंती साजरी झाल्यामुळे तेली समाजामध्ये आनंदी आणि उत्साहाचे वातावरण होते. संध्याकाळी सालाबादप्रमाणे पालखी मिरवणूक काढण्यात आली.
श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सवा निमीत्य नागपूर महानगरपालिका नागपूर येथे संत जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण व माल्यार्पण नागपूर महानगरपालिका च्या उपमहापौर सौ मनीषा ताई कोठे स्थाई समिती अध्यक्ष श्री प्रदिप पोहाने यांच्या हस्ते दिनांक ८ डिसेंबर १९ छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकिय इमारत नागपूर महानगरपालिका येथे सपन्न झाला.