Sant Santaji Maharaj Jagnade
समाजीक बांधीलकीचे संपादक व महाराष्ट्र तेली महासभेचे प्रसिद्धी प्रमुख श्री. दिलिप चौधरी यांच्या मातोश्रींचे वयोमानाने निधन झाले. त्यांना सर्वातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली
तेली समाजाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विधानसभा उपाध्यक्ष तथा माजी कृषी राज्यमंत्री, वर्धा विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा निवडूण गेलेले वर्धा जिल्ह्याचे नेते श्री.प्रमोदबाबू शेंडे यांचे दु:खद निधन झाले. या तेली समाज रत्नास ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. .परमेश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो.तसेच त्यांचे परीवारास या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रध्दांजली .........
हुबळी :- कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध तेल निर्माते व विक्रिते कै. अनंतराव विष्णूपंत फलटणकर यांच्या पत्नी होत. त्यांचे वयोमाना नुसार दु:खद निधन झाले. त्या सायगांव, जि. सातारा येथील देशमाने घराण्यातील माहेरवाशीण होत्या. त्यांना फलटणकर (चिंचकर) देशमाने, बरडकर, पवार, राऊत व शेडगे परिवारा तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.
१९४२ सालच्या स्वातंत्र्य लढ्यात महादेव बांदेकर सहभागी झाले होते. या वेळी त्यांना सात महिने करावासही झाला होता. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच पालकमंत्री ना. दिपक केसरकर यांनी बांदेकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहुन कुटूंबीयांचे सांत्वन केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कदम, तलाठी नलावडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पुणे :- पुणे कॅम्प मधील ह्या वयोवृद्ध समाज माता त्यांचे वयोमानानुसार निधन. कै. केशर काकु यांच्या त्या भगिनी होत्या. कै. काकु, श्री. जयदत्त क्षिरसागर यांच्या नात्यातील व रक्ताच्या असुनही आपले मध्यम वर्गीय जीवन त्या आनंदाने जगल्या अत्यसंस्कार समयी मा. जयदत्त क्षिरसागर, सौ. प्रिया महिंद्रे, श्री. विजय शिंदे अध्यक्ष पुणे समाज उपस्थित होते.