सकारात्मक विचाराने समाजाची प्रगती साधता येते... डाँ. शाम धोपटे.
सर्वांनी आपल्या अंगी सकारात्मक विचार बाळगले व आपले मनोवांचीत धेय्य निच्छीत केले तर आपण जीवनात हमखास प्रगती करू शकतो असे प्रतिपादन माजी प्राचार्य तथा मोटीव्हेशानल स्पीकर डाँ शाम धोपटे यांनी ऊर्जानगरातील समाजबांधवांसमोर केले. धोपटे सर ऊर्जानगरातील आयोजित तेली समाजबांधवांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात बोलत होते.
अकोला जिल्हा श्री संत संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त सर्व शाखीय तेली समाजाची शोभायात्रा. तेली समाज बांधवांना विनंती करण्यात आली आहे की, तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अकोला जिल्हा कार्यकारिणी वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील तेली समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेतर्फे १९ डिसेंबरला यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेचे महासचिव प्रा. श्याम करंबे यांनी केले आहे.
श्री संताजी समाज विकास संस्था अमरावतीच्यावतीने रविवार १५ डिसेंबर रोजी विदर्भस्तरीय सर्व शाखीय तेली समाजाच्या उपवर मुलामुलीचा परिचय मेळाव्याचे आयोजन व विवाहबंधन या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा खा. नवनित राणा, आ. रवि राणा, रमेशभाऊ गिरडे, माजीमंत्री जगदिश गुप्ता यांच्या उपस्थितीत होत आहे.
भंडारा येथे राज्य स्तरीय तेली समाज उपवर वर-वधु परिचय मेळावा मागील २३ वर्षापासुन सतत सुरू असलेला भंडारा येथे तेली समाजातील एकमेव राज्यस्तरीय 'उपवर वर-वधु परिचय मेळावा' यंदाही दि. २५ डिसेंबर २०१९ रोज बुधवारला सकाळी १० वाजेपासून श्री. संतानी मंगल कार्यालय, भंडारा येथे श्री. संताजी बहु. सेवा मंडळ, भंडारा या रजिस्टर्ड संस्थेद्वारे आयोजित केलेला आहे.