अकोला - दि २९/०१/२०१८ रोजी संताजी सेना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष तथा संताजी सेना अकोला जिल्हाअध्यक्ष मा. श्री. प्रमोददादा देंडवे यांना तेली समाज भुषण पुरस्कार देण्यात आला स्वराज्य भवन अकोला येथे ओबीसी महासंघ अकोला द्वारा आयोजित ओबीसी मेळावा व समाज भूषण पुरस्कार सोहळा २०१८
अकोला तेली समाज : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील ५-६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाच्या नराधमांना पाठीशी घालण्याची भूमिका संस्थाध्यक्षांनी घेतली आहे. आरोपींवर तातडीने गुन्हे दाखल करून अटक न झाल्यास महाराष्ट्र तैलिक महासभेच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकान्यांना निवेदनातून देण्यात आला.
मुर्तिजापूर तेली समाज : धुळे जिल्ह्यातील दौंडाईचा शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा येथील संताजी सेना व तेली समाज मुर्तिजापूरच्या वतीने निषेध करण्यात येवून अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तेली समाज गोंदिया महाराष्ट्र प्रान्तिक तेली समाज शाखा देवरी येथे संताजी जयंती महोत्सव व वधु वर परिचय मेळावा संपन्न त्यामधे उपस्थित मान्यवर आमदार संजयभाऊ पुराम आमगांव देवरी वि. क्षेत्र, सहषराम कोरोटे महामंत्री कांग्रेश पार्टी गोंदिया जिल्हा, शुभाषजी घाटे महामंत्री तेली समाज नवी दिल्ली,
नागपुर तेली समाज सामूहिक विवाह समितीच्या कार्यालयाचे उद्घाटनकरण्यात आले यावेळी तेली समाजाचे बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते. रमेश भाऊ गिरडे, शेखर भाऊ सावरबांधे, रामुजी वानखेडे, अभिजीतजी वंजारी ,पुरुषोत्तमजी घाटोल, मोहन आगाशे इतर पदाधिकारी व समाजाचे नेते समाज कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते