लोकांच्या घर बांधण्याचा प्रश्न सुटावा म्हणून ही संस्था कार्य करते. स्वत:चे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण जागा मिळविण्यापासून घर बांधेपर्यंंत मोठे सोपस्कार असतात. त्यात अर्थसहाय्य असल्याशिवाय काहीच करता येत नाही. घरासाठी अर्थसहाय्य करणे, भूखंड योग्य किमतीत उपलब्ध करून तेथे नागरी सोई निर्माण करण्याचे कार्य संस्थेने केले आहे.
तेली समाज महासंघ म्हणजे एक चळवळ आहे. तेली समाजाच्या सर्व नागरिकांची ही एक शीर्षस्थ संस्था आहे. शिक्षणाचे प्रश्न, नागरीकरणाचे प्रश्न आणि तेली समाजाला भेडसावणारे अनेक प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून शासनापर्यंंत पोहोचविणे आणि न्याय मिळविण्यासाठी धडपडणे हे महासंघाचे कार्य आहे. तेली समाजातील लोकांना एकत्र करण्यासाठी आणि समाजाची बांधणी करण्यासाठी हे कार्य सुरू आहे.
तसा सर्व मराठवाडा आणी या मराठवाड्यातील जालना शहर म्हणजे करडी तेलाचे आगर होते. खेडो पाड्यात तर तेली वस्तीत, तेली गल्लीत, तेली आळीत सुर्यादया पुर्वीच घरोघरी तेल घाना सुरू होत असे. आगदी सुर्य मावळे पर्यंत. करडी तेल व करडी पेंउीची महाराष्ट्राची बाजारपेठ म्हणून जालन्याला नाव मिळाले होते. इथे ही घानी सुरूच होती. तसा सर्व माल इथे विक्रीला येत असे. आणी होलसेल खरेदी साठी महाराष्ट्र जालन्याला येत असत इतकी भरभराट या बाजार पेठेची झाली होती. या बाजारपेठेत श्री. शंकरराव यांचे आजोबा आले. खेडोपाड्यातून आलेला माल आडतीवर विकू लागले. शंकररावाचे वडील आनंदराव हाच व्यवसाय करीत होते. तसा 1972 चा दुष्काळ 1965 पासुनच सुरू होता. त्याने उग्र रूप 1972 ला जरूर धारण केले होते.
पुणे :- पुणे समाजाचे माजी अध्यक्ष कै. नंदू क्षिरसागर यांचे बंधू नाना म्हणजे एक गोरगरीबांचे कैवारी होते. दुर्लक्षित कामगारांना संघटित करून रस्तयावर उतरून न्याय मिळवून देणोर नाना होते. पुणे शहरातील रिक्क्षा चालविणार्यांचे ते नेते होते.
पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ? ( भाग 3 )
पाटलाने व ब्राह्मण समाजाने आपली पडताळणी केली आहे. या पडताळणीतून त्यांनी आपल्याला एक प्रमापत्र दिले. तुम्ही विर अहात, तुम्ही मोठे आहात. तुमचा शत्रू दूर नसतो तुमचा शत्रू तुमच्या जवळचाच आहे. जात मोठी करावयाची असेल तर तुमच्या जवळच्या रक्ताच्या भावकीच्या माणसात लढा ही लढाई सोपी आसते. या लढाईतून तुम्ही झटपट मोठे व्हाल.