महाराष्ट्राच्या जडण घडणीत देशाच्या सामाजीक, सांस्कृतीक विकासाचा दिशा दर्शक म्हणुन वर्धा जिल्हा ओळखला जातो ही ठेवण आज ही जपली जाते. या जिल्ह्याने माणुस घडवीण्याची प्रक्रिया सुरू केली. एक कष्टकरी घर एक शेतकरी घर, एक पैलवान घर आशा समान्य घरातील श्री. रामदास तडस कृषी उत्पन्न बाजार समीतीचे एक सदस्य म्हणुन राजकीय क्षेत्रात उमेदवारी सुरू करतात व आज वर्धा मतदार संघाचे खासदार म्हणुन निवडून जातात.
संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सवाचे औचित्य साधुन तेली समाज मंडळ नवखळा. संताजी फाउंडेशन नवखळा नागभीड द्वारा संजय येरणे लिखित यमुना - संताजी जगनाडे महाराजांची सावली या जगात सर्व प्रथम साकार झालेल्या कादंबरी चे प्रकाशन मा. आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे हस्ते मा. शामरावजी सातपैसे यांचे अध्यक्षतेत संपन्न झाले.
चंद्रपूर संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात लावण्यात आलेली फलक मनपा प्रशासनाने काढले. यावर आक्षेप घेण्यात आला असून मनपा प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक आकाश साखरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
बुलढाणा - स्थानिक संताजी कॉन्व्हेंट मेहकर येथे शैक्षणिक सत्र २०१६-१७ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वर्ग ५ व वर्ग ८ मधील विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम सुयश प्राप्त केले आहे . वर्ग ५ मधून १) प्रणव तेजनकर २) कु.प्राची आघाव ३) कु. प्रियंका अंभोरे ४) आनंद गवई ०५) अनुज मोरे ६) देवाशीष देठे व वर्ग ८ मधून १) कु.वेदिका डोंबळे २) शोनक व्यवहारे ३) सौरव तोंडे ४) कु.नम्रता जुनघरे
पुणे - देशात प्रथमच पुणे महानगर पालिकेने एक लाख रूपये व सन्मान चिन्ह देऊन श्री संत संताजी पुरस्कार जाहीर केला होता. पहिला व सन 2017 चा पुरस्कार मनपाच्या सभागृहात 5 जानेवारी रोजी संपन्न झाला. या वेळी अध्यक्ष स्थानी महापौर श्री. प्रशाांत जगताप अध्यक्षस्थानी होते. सदरचा पुरस्कार श्री. संत साहित्याचे अभ्यासक व माजी आमदार मा. उल्हासदादा पवार यांना मा. सदानंद मोरे यांच्या हास्ते देण्यात आला तेंव्हा ते म्हणाले. श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांच्यामुळे संत तुकाराम हे अभंगा सहीत अस्तीत्वात राहिले. त्या काळातील व्यवस्थेतील सामान्यांंनी त्याग केला. म्हणुन आज तुकोबा गाथा अस्तीत्वात आहे.