कोरपना श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलिक विकास संस्था कोरपना यांच्या वतीने नुकतेच संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी कोरपना शहरात मोठ्या भक्तीभावाने आयोजित करण्यात आली. यानिमित्य श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची पालखी राम मंदिर ते नवनिर्मित संत संताजी जगनाडे महाराज मंदिरापर्यंत काढण्यात आली. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली.
श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी स्मरणोत्सव सोहळा, कार्यक्रम पत्रिका, मंगळवार, दि. ९ जानेवारी २०२४ सकाळी ९.०० वा, स्थळ • श्री संत संताजी जगनाडे महाराज स्मारक जगनाडे चौक, ग्रेट नाग रोड, नंदनवन, नागपूर- ९. संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी पर्वावर या सोहळ्यास आपन सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.
अमरावती जिल्हा तैलिक समिती, अमरावती व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभाग द्वारा सर्वशाखीय तेली समाज उपवधु - वर परिचय मेळावा व रेशीमगाठी कुर्यात सदा मंगलम पुस्तिका प्रकाशन सोहळा २०२३-२४ रविवार दि. २४ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी १० ते ४ स्थळ :- श्री संताजी महाराज सभागृह, भुमीपूत्र कॉलनी, काँग्रेसनगर, अमरावती
तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी शुभगंधा मंगल कार्यालय मु. पो. लोवले मयूर बाग स्टॉप संगमेश्वर देवरूख रोड ता. संगमेश्वर येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या तेली समाज वधु वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन सोहळा महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभा अध्यक्ष माननीय खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी महोत्सवा निमित्त ह.भ.प.गोविंद महाराज जाटदेवळेकर यांच्या अमृततुल्य वाणीतून भव्य मार्कंडेय पुराण, स्थळ :- तिळवण तेली समाज धर्मशाळा, श्रीक्षेत्र पैठण, प्रारंभ : मार्गशीर्ष कृ. १० शके १९४५ रविवार, दि.०७/०९/२०२४, सांगता पौष शु. २ शके १९४५ शनिवार, दि. १३/०१/२०२४, मिरवणुक शनिवार, दि. १३/०१/२०२४ रोजी सकाळी ८ ते १०, पुराणाची वेळ * दुपारी १२ ते ०४ वा., आशिर्वाद - विद्याभूषण सदगुरू मुकुंदकाका जाटदेवळेकर