Sant Santaji Maharaj Jagnade
उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यातून मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी लग्नानंतर तब्बल चौदा वर्षांनी दांपत्याने बारावाची परीक्षा दिली. विशेष म्हणजे दोघेही उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या मुलांनी पेढा भरवून मम्मी पप्पांचे कैतुक केले.
वाई : - सातारा सैनिक सहकारी बँकेचे शाखा मॅनेजर श्री. शरद दत्तात्रय किर्वे यांची ही मुलगी एस.एस.सी. परिक्षेत द्रविड हायस्कुल वाई या प्रशालेतुन ९८ मार्कांनी वाई शहर व तालुक्यात प्रथम आली आहे. तिचे अभिनंदन किर्वे, दळवी व देशमाने परिवारा तर्फे केले गेले आहे.
माणिकनगर नांदेड येथील रहिवाशी सौ. दिप्ती गजानन देशमुख यांना महाराजा सयाजीराव युनीलव्हरसीटी ऑफ बडोदा (गुजरात) वडोदरा च्या ६३ व्या दीक्षांत समारंभात फार्मसी विषयात कुलगुरू यांच्या हस्ते पीएचडी प्रदान करून गौरविण्यात आले.
बीड.(प्रतिनिधी) आष्टी .जि.बीड येथील भगवान बाबा महाविद्यालयाची विदयार्थीनी कु.लक्ष्मी भारत शेंदूरकर हिने टारगेट बॉल स्पर्धेत भारतीय टीमचे प्रतिनिधीत्व करीत भुतान येथे झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कसब दाखवत देशाला सुवर्णपदक मिळवत बेस्ट प्लेअर ऑफ द वर्ल्ड हा मान मिळवत आपल्या कर्तृत्वाने जिल्हयाचा देशाचाच नव्हे तर समाजाचाही अटकेपार झेंडा फडकवल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
गोवा-मडगांव (प्रतिनिधी): अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे राज्याचे रा.कॉ.विधीमंडळ उपनेते आ.जयदत्त क्षीरसागर यांची तिसर्यांदा बिनविरोध निवड झाल्याची घोषण मुख्य निवडणुक अधिकारी तथा महासभेचे कार्याध्यक्ष रामलाल गुप्ता यांनी जाहिर केले. राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुक कार्यक्रम विविध राज्यातील सदस्यांचा मागणीवरुन महाराष्ट्राच्या बाहेर गोवा राज्यात मडगांव येथे दि.१७ रोजी घेण्यात आला.