Sant Santaji Maharaj Jagnade
इंदापूर (प्रतिनिधी) :- पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील तालुका तेली समाज महासभा श्रीसंत संताजी महाराज जगनाडे ट्रस्ट व समस्त तेली समाजाच्या वतीने श्री संताजी महाराज पुण्यतिथी उत्सव आगळ्या वेगळ्या
व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला नव्हे हा उत्सव सोहळा म्हणजे समाजाला एक नवी दिशा देणारा ठरावा असा झाला.
श्री संत संताजी जगनाडे महाराजाच्या ३१५ व्या पुण्य तिथी सोहळ्यामध्ये राहुरी कॉलेजचे प्रा. डॉ. सुधाकर चौधरी यांनी लिहीलेल्या अप्लाईड झुलॉजी व ऍनीमल सिस्टीमॅटीक्स या पुस्तकाचे प्रकाशन श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रांतिक तेली समजाचे कोषाध्यक्ष श्री. गजानन शेलार निफाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भुषण कर्डिले, नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे, बानार समितीचे सभापती अरूण तनपुरे, तेली समाजसेवक साप्ताहीकाचे संपादक प्रा. वसंतराव कर्डिले स्नेहीजनचे संपादक छगन मुळे, तेली समाजाचे जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ डोळसे तालुका तेली समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे सदाशिव पवार, संजय पन्हाळे, संदीप सोनवणे, वाय. एस. तनपुरे उपस्थीत होते.
श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांची ३१५ वी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन राहुरी तालुका - तेली समाजाच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी संताजी महाराज दिनदर्शिकेचे प्रकाशन मा. खा. प्रसादराव (बापूसाहेब) तनपुरे डॉ. सौ. उषाताई तनपुरे - नगराध्यक्षा राहुरी न. प. मा. अरूणसाहेब तनपुरे, सभापती राहुरी ता. कृषीउत्पन्न बाजार समिती यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा. बापुसाहेब तनपुरे यांनी श्री. संत संताजी जगनाडे महाराज्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिली.
तेली समाज वधु -वर मेळावा वधु -वर फाॅर्म
Nashik city teli samaj Vadhu Var from 2014