Sant Santaji Maharaj Jagnade
पेण :- येथिल तेली समाज सेविका सौ. चंपाबाई उर्फ मंगला वैरागी यांचे पनवेल येथे दि. १०/१/२०१५ रोजी हृदय विकराने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. भाव, भावना व अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम असणार्या सौ. चंपाबाई यांचे जन्मग्राम पनवेल असुन येथील प्रसिद्ध पन्हाळे कुटूंबातील स्व. आबासाहेब पन्हाळे, माजी पनवेल नगरपालिका अध्यक्ष आणि माजी जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष यांची ती पुतणी होती.
शिरवळ, सातारा - मधील श्री संताजी महाराज तेली महिला बचत गट व श्री संत जगनाडे महाराज तेली महिला बचत गट यांच्या मार्फत शिरवळमध्ये श्री संताजी महाराज पुण्यतिथी सजारी करण्यात आली. यामध्ये समाजातील सर्व महिला व तरुण वर्ग सहभागी झाली होती.
साकुरी :- तालुका राहाता जि. अहमदनगर येथे श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त साकुरी येथे तेली समाज बांधवातर्फे सामुदायीक अभिषेक करण्यात आला. महापुजा करून गावातून सजवलेल्या रथातुन संताजी महाराजांच्या प्रतिमेची ढोलताश्यांच्या गजरात पुढे भजनी मंडळ सर्व भगिनींनी, मुलींनी भजन म्हणत, फुगड्या खेळत भक्तीमय वातावरणात आनंद लुटला यावेळी गावात पालखी रस्त्यात सर्वत्र रांगळ्या घालण्यात आल्या होत्या. व ठिकठिकाणी समाज बांधव श्री. संपतराव लुटे व श्री. कैलास लुटे या समाज बांधवांनी सामुदायीक आरती केली. व त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
पुणे :- सन २००३ चा तेली समाजाचा महामेळावा यशस्वी करणारे जे जे होते त्यातील श्री. रामदास धोत्रे हे प्रमुख होते. महाराष्ट्र तेली महासभा पश्चिम महाराष्ट्रात ते रूजवणारे पहिले होत. त्यांनी ही संस्था सक्रिय होण्यात तन मन व धन खर्ची केले.
मुंबई :- बृहन्मुंबई तिळवण तेली समाज, मुंबई या उपरोक्त संस्थेच्या वतीने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक २२ फेब्रु २०१५ रोजी दुपारी १.०० वा. म्युनिसिपल स्कुल सभागृह ना. म. जोशी. मार्ग, डिलाईल रोड, मुंबई - ४०००११ येथे आयोजित करण्यात आला.