Sant Santaji Maharaj Jagnade
संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ मध्ये झाला. आजोबा भिवाशेठ जगनाडे, वडील विठोबाशेठ व आई सुंदुंबरे येथील काळे घराण्यातील मथुबाई. संताजीचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब ठेवणे यापुरतेच होते. घरची परिस्थिती तशी चांगली होती. त्यामुळे संताजीला कमतरता कसलीच भासली नाही. वयाच्या १० व्या वर्षीच वडिलांनी संताजीला तेल धंद्याचा परिचय करूण दिला. व लग्नही ११ व्या वर्षीच खेड येथील कहाणे घराण्यातील, यमुनाबाई बरोबर झाले. यमुना वयाने फारच लहान होती. संसार म्हणजे काय ? याचे दोघांनाही ज्ञान नव्हते. त्या काळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. संताजी महाराजांची व तुकाराम महाराजांची भेट शके १५६२ मध्ये म्हणजेच जानेवारी १६४० मध्ये झाली. तुकोबाच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच रखमाबाईला संतु नावाचा मुलगा झाला. तो दिडदोन वर्षातच वारला. रखमाबाई सुद्धा दम्याच्या दिर्घ आजाराने वारल्या. संताजीला किर्तनात पहाताच तुकारामाना आपल्या पुत्राची आठवण झाली. त्यांच्या मुलाचे नावही संतु असल्या कारणाने. त्यांना संताजी बद्दल प्रेम, आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे महाराजांनी संताजीला आपल्या सानिध्यात ठेवले.
रविवार दि. १५ फेब्रुवारी २०१५ - महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व समस्त तेली समाज संस्था, मुंबई व उपनगरे च्या वतीने महाचिंतन शिबीराचे आयोजन करण्यात आले. महा ह्यासाठीच म्हणावयाचे कारण म्हणजे १५००० स्वेकर फुटाचा मंडप तो पण लग्ना सारखा. शंभर फुट लांब भव्य स्टेज व त्यावर श्री संत संताजी महाराजांची आठ फुट भव्य मुर्ती,
साई बाबा यांच्या पाद स्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डी नगरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच "डॉ. मेघनाद साहा" यांची पुण्यतीथी अ. नगर जिल्हा तेली समाज महासभा व राहता तालुका तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी साजरी करण्यात आली .
भव्यदिव्य मेळावा संपन्न करण्यास कमाल ७० लाख ते ७ लाख रूपये आज खर्च करावे लागतात. महाराष्ट्र भर साजरे होणारे जे मेळावे आहेत त्या सर्वांचा किमान खर्च हा १० ते १२ कोट रूपयांचा असावा. तो गोळा करण्यास लागणारी मानव शक्ती ही अफाट खर्च होत आसते. परंतु वधु -वर मेळावा ही संकल्पना समाज बांधवांनी न सांगता न ठरविता राबवली असेल तर ती श्री संत संताजींच्या समाधी स्थळी. सुदूंबरे येथे. श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे ही संस्था मुळात समजाची मातृृसंस्था.