सदरच्या संस्थेतील शिस्तबद्ध कामाचे नियोजन तसेच पदाधिकार्यांची सामाजासाठी असलेली आपुलकी सर्व घटकांना एकत्र आणण्याची प्रवृत्ती व समाजाचे जीवनमान कशा प्रकारे उन्नत करता येईल या बाबींची तळमळ मला जाणवली मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून या संस्थेत कार्यरत असलो तरी घेण्यात येणारे निर्णय हे सर्वानुमते घेतले जातात ही बाब उल्लेखनिय आहे.
जिल्ह्यातील तीन तालुक्यातुन आमदार पदासाठी तेली समाज तिकीट मागु शकतो अशी परिस्थीती आहे. स्वत: किसन घोडके भाजपा मधुन आमदार की साठी उत्सुक असुन पुढील काळात समाजाचे वतीने तिकीट मागणीसाठी दबाव तंत्राचा वापर करण्यात येईल
महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा बैठक :- सांगली जिल्ह्याचे डॉ. संजय गताडे यांनी सांगीतले की, तालुका व जिल्हा पातळीवर सामाजाची संपर्क कार्यालये असावीत तेथुन सर्वसामान्य समाजबांधवास देखील महाराष्ट्रात कुठेही पदाधिकार्यांशी संपर्क साधता यावा. समाजाने हायटेक व्हावे.
- पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र
परंतु १५ वर्षा पुर्वी महाराष्ट्र तेली महासभा प्रांतिक अध्यक्ष पद मिळाले हे मिळाल्या नंतर या पदाला न्याय देणे हे ठरवून ते महाराष्ट्रात फिरू लागले. प्रवास, निवास जेवण हे स्वत: करत सुदुंबरे व नागपुर येथिल महामेळावे भरवणे हे अवघड धनुष्य खांंद्यावर घेतले. ते घेताना समाज ढवळून काढण्यासाठी त्यांनी जिल्हा तालुका व गावे पिंजुन काढली किमान चार लाख बांधव हजारो मैलावूरन सुदूंबरे येथे घेऊन येण्याचे दिव्य त्यांनी यशस्वी केले. या झुंजीत लाखो रूपये गेल. पण मागे सरले नाहीत. परंतु महामेळाव्याद्वारे महाराष्ट्रातील बड्या राजकरण्यांची झोप उडवली हा अफाट समाज जर असाच जागा होऊन संघटीत झाला तर आपले राजकारण तेल्याच्या वळचनीला जाईल. या वेळी काही हुशार मंडळींनी तेली आडवा तेली हटवा हा अघोषीत अजंठा राबवला. मी तेली आहे. आणि तेली म्हणुनच निवडून येतो हे ठसवणारे रामदासजी तडस यांच्यासाठी मोर्चे बांधणी केली. त्यातुन आमदारकीत अपयश दिले. हे अपयश खिशात ठेवून ते समाज पिंजुन काढत होते. ते करिताना घराला घर पण देणारी जवळची ५० एकर जमीन घरापासुन दुर गेली हे शेवटी समजले पण ते डगमगले नाहीत हीच त्यांची तेली निष्ठा.
राज्यस्तरी भव्य वधू-वर-पालक परिचय मेळावा,
पुणे स्थळ - गणेश कला क्रीडारंगमंच, स्वारगेट, पुणे
वेळ - शुक्रवार दि. 1 मे 2015 सकाळी 10 ते सायं. 6 पर्यंत.