मत दे नाहीतर गाव सोड. विरोधात गेलास तर बेचिराख करू वळ वळ केलीस तर खांडोळी करू तु तेली आहेस राजकारण हा विषय नाही. ही कॉंग्रेस संस्कृती मधील मराठेपणाची साथ सोबत. आगदी ज्या त्या गावात ज्या ज्या भागात मराठेशाहीची ही दादागीरी. या दादागीरीने गुलामी दिलेली. आपण ती सुखात जपत होतो. सुखात यासाठी या बद्दल ना खेद ना दु:ख ना उठाव, ना संघर्ष ही वास्तवता स्विकारून जगत होतो. परंतु आपण मराठ्यांचे गुलाम आहोत याची जाणीव होती या जाणीवांच्या उणीवांना खतपाणी देण्याचे काम भाजपातील ब्राह्मणशाहीने १९७७ मध्ये प्रथम केले. मंडल आयोग या प्रश्नावर जय प्रकाश नारायण यांची क्रंाती माती मोल करून भाजपा स्थापन करणारी ब्राह्मण्य मंडळी होती मंडल साठी लढाई लढण्यापेक्षा रामा साठी लढाई लढवणारे ब्राह्मण्य होते. याच दरम्यान ब्राह्मण्याने मंडल कोर्टात गोठवला. आपला विकास गोठवला याची साधी जाणीव न होऊ देणारे ब्राह्मण्य होते. ओबीसीतील जातींना मराठ्यांंची गुलामगीरी झटकण्यासाठी त्यांनी अनेक जातीत नेते तयार केले जन्माने तेली, माळी, वंजारी, धनगर अशा जातीतील पण कर्माने ब्राह्मण प्रणाली ठेवली यातुन अनेक ओबीसी जात समुह जवळ आले याचे फळ म्हणजे महाराष्ट्रात ब्राह्मण्य जपणारा मुख्यमंत्री नवी गुलामी घेऊन आले.
तेली समाजाच्या मतावर निवडूण आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानू या. कारण जे जे तेली मतावर पोसलेत त्यातील ते एक. त्यांच्या मतदार संघात नोंद ठेवावा असा समाज आहे. शंकराचार्यांनी हि एक समन्वय साधला त्या समन्वयातून एक प्रणाली तयार केली. त्या प्रणालीला शेकडो वर्षानी हिंदू हे नाव दिले गेल. त्या काळी जो राजा आसे तो राजा ही ब्राह्मणाने नेमला आसे. त्याला पहिली ब्राह्मणाची बाजू घ्यावी लागे. त्याला पहिले ब्राह्मणाचे हित साध्य करावे लागे. या नंतर प्रजा तो राजा विरोधात गेला किंवा लढाईत हरला तर दुसरा राजा त्याला ही ब्राह्मण्य पणासाठी राबावे लागे यातूनच प्रजा गर्तेत राजा लढाईत ब्राह्मण सुखात नांदत होते. अशी अवस्था होती. म्हणून मुस्लीम आक्रमण आले. आक्रमण करणार्या मुस्लीमांनास ब्राह्मण्य विरोध करीत नव्हते तर सत्तेत सहभागी होते. आसा शेकडो वर्षांचा इतिहास आहे. तेली मतावर निवडून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना धर्माचे ठेकेदार बोलवले. ही धर्म सत्ता आता राजसत्तेला चिकटण्यास सुरूवात झाली. भविष्यात ती आपला पाया भक्कम करेल. या देशाची घटना श्रेष्ठ नव्हे तर धर्मसत्ता श्रेष्ठ हे करू ही पहातील. याची दिशा स्पष्ट झालीच आहे.हे एक ठिक या साठी तेली समाजाने भरभरून मतदान केले नवी गुलामगीरी स्विकारली.
जय संताजी !!!