तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 5)
आज रजिस्टर केलेली तेली समाजाची संस्था या पुर्वी रजीस्टर केली होती. तिचे संघटनेने सभासद, अजिव सभासद बनविलले होते. असे अनेक बांधव स्पष्ट सांगतात. पुन्हा ही संस्था वेगळ्या नावाने रजिष्टर केली गेली. या प्रक्रियेत पहिल्या संस्थेच्या मंडळींनी निबंधाकडे हिशोब सादर केले नसतील त्यामुळे प्रश्न उभे राहिले असतील. हे ही मान्य करु परंतु संस्था नोंदणी करण्याची प्रक्रिया बरेच दिवस सुर होती. त्या बाबत काही मिटींगा ही झाल्या. परंतु संघटनेच्या पदाधिकार्या समोर त्याचे म्हणजे घटनेचे वाचन झाले का ? जर झाले असेल तर ते वादळ विनाकारण आहे. आणी फक्त काही विश्वासु मंडळींना दाखवुन नोंदी केली असेल तर वादळ योगयच म्हणावे लागेल. या ठिकाणी एक मुद्दा पुन्हा मांडतो भारताची राज्यघटना म्हणजे संविधान जर प्रत्येकाने घेऊन वाचन केले तर देश जगात एक नंबरचा होईल.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 4)
फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात एका बांधवांची भेट झाली आगदी त्यांनी दमबाज भाषेत सांगितले. बरे लिहा टिका लिहु नका. जर आसे घडलेच तर ते कुठे अडकवतील व कुठे संपवतील हे सांगता येणार नाही. दहशदवाद जो म्हणतो, दादागीरी जी म्हणतो ती हिच. तेली गल्ली मासिकाच्या सप्टेंबर 2013 च्या अंकात मी मांडले होते. (पवार व चव्हाण या नेत्याबाबत) असल्या दादागीरीचा पुरता तळपाट होतो. मराठा समाजाच्या दादागीरीचा शेवट काय झाला हे आपण पाहिलेत. मग समाज घडवायला निघलोत जाहिर सभेतगर्जना आपण करतो. तेली हा एक आहे हे पटवतो. काळानरुप वागा भेद गाडा म्हणातो पण प्रत्यक्ष काय ? कोयना नगर येथे जो तिळवणचे बोळवण करा सांगितले. पनवेल येथे कुत्र्याची उपमा दिली गेली. कल्याण येथे किडा मुंग्यांची उपमा दिली. ही व्यक्तव्य करणार्या पदाधीकारी बांधवांची भुमीका रास्त आहे ?
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 3)
मी सुरूवातीलाच मांडले मत असावीत या मतातुन संघटना उभी रहाते. सन 2010 पुर्वी जे मोजके शिलेदार खा. तडस साहेबाकडे होते त्यांना केशरकाकुंचे मार्गदर्शन होते. त्यांच्या विचाराचा प्रभाव होता तडस साहेबांची संघटन प्रणाली होती. पुण्या सारख्या परिसरात शेकडो जन यात झोकुन देऊन उभे होते. त्यांचे नेतृत्व आकाराला येऊ लागले होते. पण पुढील वाटचालीत यातील बरीच वयोवृद्ध झाले काहींना निर्णय प्रक्रिये पासुन दुर ठेवले. काहींना घरचा रस्ता दाखवला गेला. याच ठिकाणी नाराजीची लागन मुळ धरू लागली.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 2)
स्वातंत्र्याच्या पहिल्या काळात देशात विखुरलेल्या तेली समाजातील अनेक पोट शाखा एकत्र आल्या त्यांनी तैलिक संघटना स्थापन केली. उद्देश काय तर समाजाचे सामाजीक संघटन व्हावे सामाजीक सांस्कृतीक प्रश्न मिटावेत. या साठी दिल्ली येथे मुहर्तमेड रोवली.. त्या काळात दिग्रज येथिल कै. माधवराव पाटील आमदार होते. त्यांनी देशपातळीवरील पदाधीकार्यांना बोलावून महाराष्ट्रभर परिषद्या लावल्या दुर्देव आसे विदर्भ वगळता याला जनाधार मिळाला नाही. पण जेंव्हा समाजमाता कै. केशारकाकु यात सामिल झाल्या तेंव्हा बर्याच बांधवांना त्यांनी याची गरज पटवुन दिली. मा. खा. शांताराम पोटदुखे यांची साथ ही मिळाली. आणी तैलीक महासभेचा पाया त्यांनी इथे निर्माण केला. त्या वेळी त्या खासदार होत्या. आशा वेळी अहमदनगर येथील सभेत त्यावळचे आमदार श्री. रामदास तडस हे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले. तरूण नेतृत्व त्यात खेळाडु. संघटन कसे बांधावे याची प्रत्यक्ष अनुभवातुन जाणिव. हेवे दावे आपण मिटवायला आहो ही जिद्द. समाज जागा झाला पाहिजे ही धडपड. आपल्या साध्या शब्दाने ही समाज विस्कटु शकतो. ही नजर. या नजरेत आम्ही कुठे चुकलो किंवा समाजातील सामान्य बांधवांने जी चुक समोर आणली तर ती प्रांजळ पणे मान्य करून सुधारणे ही पैलवानी प्रकृती.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 1)
कोणत्या ही संघटनेच्या वाटचालीत अव्हाने असावीत सोबतीला वादळे ही असावीत. त्या संघटनेच्या वाटचाली बद्दल चर्चा व्हावी, त्या संघटनेच्या यशा बरोबर अपयशाचा आराखडा उभा केला जावा. त्या संघटनेच्या पदाधीकार्यांच्या धोरणा बद्दल कौतुक ही व्हावे तेवढेच चुका बद्दल चर्चा ही व्हावी. आणी नुसतीच भाटगीरी असेल तर ती संघटना ही हुकूमशाहीच्या बाजुने वाटचाल करून कायमची उभी रहाते किंवा नामशेष होत आसते. हा इतिहास आसल्या कारणाने तैलिक संघटने विषयी जे सध्या वादळ उभे राहिले तेंव्हा या बद्दल जनमानसात जे चालले आहे ते मांडत आहे. मान, पद मिळविण्यासाठी, मग ते पद टिकवण्यासाठी, मग मला का हाकलुन लावले या साठी. मी म्हणतो तेच सत्य किंवा सत्य असेल ते माझे ही वृत्ती न रहाता स्व केंद्रित जी वृत्ती बोकाळलेली आहे.