श्री. मोहन देशमाने प्रसिद्धी प्रमुख श्री संत संताजी म. तेली संस्था सुदूंबरे
तेली गल्ली (गावकुस) मासिकाची सुरवात होती माझे सासरे कै. गणपतराव खोंड व कै. गणपतराव भांडकर यांचे स्नेहसंबंध होते. घरात नेहमी चर्चा होत असे आणि तोच धागा पकडुन मी पार्थडी च्या स्टँडवर उतरलो. भांडकरांची स्ँडड वर चौकशी केली बबनराव भांडकर कुठे आहेत. तेंव्हा समजले स्टँड समोरची या टोका पासुन त्या टोका पर्यंतची जी इमारत आहे ती बबनराव भांडकरांची उंची पुरी मुर्ती अंगात लेंगा शर्ट डोक्यावर टोपी असलेल्या भांडकरांची भेट झाली. या पहिल्या भेटीला त्यांनी विश्वास दिला माझ्या कडून विश्वास घेतला सुद्धा. आशा या जगाला गवसनी घालणार्या पण जमिनीवर चलणार्या समाज बांधवाच्या जीवन प्रणालीची एक साठवण.
देडगांव ता. नेवासा हे मुळ गाव सन 1993 मध्ये त्यांनी आपले गाव सोडले ते कोरगाव येथे आले. सुरवातीस छोटे मोठे उद्योग करू लागले. या नंतर रिअल इस्टेट उद्योग निवडला. या उद्योगाला चांगला जम बसविला याच जोडीला समाज सेवेची आवड. तुळजाभवानी तरूण मंडळाची सुरूवात केली. जय संताजी युवक संघटना सर्वांना बरोबर घेऊन सुरू केली. श्री. संताजी पुण्यतिथी साजरी केली जाते.
जामखेड तालुक्यातील पानाळी गाव या गावातून कै. खंडू देशमाने जामखेडला आले. येथे राऊत मेहुणे होते. देशमाने यांनी प्रथम निवार्याची सोय पाहिली व कुटूंबासाठी झटु लागले. त्यांना 1) बाबासाहेब, 2) दत्तात्रय 3) नवनाथ, 4) जालिंदर, 5) भाऊसाहेब 6) विश्वास ही मुले व 3 मुली असे मोठे कुटूंब ते संस्कारीत करित होते. श्री. बाळासाहेब देशमाने वडिलांच्या बरोबर बैलाचा व्यापार काही काळ केला परिसरात ऊस तोड मजुर होते. त्या साठी त्यांचे बैलगाडी हे साधन होते. त्यामुळे व्यपार बरा होता. परंतु बाबासाहेबांनी जास्त लक्ष संकरीत गाई खरेदी विक्री सुरू केली. यात ही जम बसविला. याच तपनेश्वर मंदिर रस्त्यावर रहात्या घरा मध्ये किराणा मालाचे दुकान सुरू केले. व्यापाराची संस्कृती जोपासत त्यांनी जामखेड मार्केट यार्ड मध्ये आडत दुकान सुरू केले.
तसे शाम कर्पे हे उच्च शिक्षित आहेत. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा ते व्यवसायाकडे वळले जीवनाची सुरूवात त्यांनी दुध विक्री पासुन केली. सलग 10 वर्ष ते दुध डेअरी चालवित होते या नंतर त्यांनी व्यवसाय बदल करावयाचे ठरविले. जमीन, खरेदी विक्री व बांधकाम या क्षेत्रात ते उतरले. हा व्यवसाय तसा बेभरवशाचा. पण त्यांनी इथे आपली एक पत निर्माण केली आहे. कोणाला अडचणीत नेहुन कुणाला फसवुन चार पैसे कमविण्या पेक्षा त्यांनी इथे सचोटीची मोजपट्टी लावली यातुन चार पैसे मिळालेच पण अनेक सुखी कुटूंबांचा विश्वास हे ते संपादन करू शकले. या मुळे संगमनेर परिसरात कृष्णा इस्टेट ही एक विश्वासाची पत निमार्र्ण करू शकले. स्पषट विचार, स्वच्छ व्यवहार, मी सुखी झालो इतर ही व्हावेत ही प्रणाली यामुळे ते सर्वत्र पर्यंत परिचित झालेत. कर्पे यांच्या वाटचालिस हार्दिक शुभेच्छा.
कृतार्थ कै. नारायण तुकाराम देवकर यांच्या आत्मचरित्राचा काही भाग
12 मार्च 1938 माझा जन्मदिवस. सहासष्ट वर्षांच्या कालप्रवाहांत अनेक सुहृद भेटले, देवासारखी माणसं भेटली, तर काही दानवासारखी देखील. तरी देखील माझ्यातला नारायण अविचल राहिला, सार्या झंझावाताला तोंड देत माग्रक्रमण करीतच राहिला.
भूतकाळातल्या आठवणींचा हा प्रवास, मला घेऊन जातो तो नगर शहराच्या पूर्वेस वसलेल्या बुर्हानगरला. जगदंबामातेचं देवस्थान. तुकाराम भुजंगा देवकर माझे वडिल. आमचं सारं घराणंच भगताचं. भगताचं म्हणजे देवीमातेच्या पुजार्याचं. पण पूजेवर मिळणार्या उत्पन्नातून घर चालविताना वडिलांची ओढाताण व्हायची. मिळणारं उत्पन्न आणि खाणारी तोंडं याचं गणित काही बसत नव्हतं. घरामध्ये दारिद्रयाचा सुखेनैव वावर चालू होता. पोटच्या पोरांसाठी काही तरी करणं भाग होतं. देवीमातेची मनोभावे सेवा करणारे आमचे वडील मग असहाय्यपणे काम करू लागले., तेल्याच्या घाण्यावर. भिंगारच्या मुरलीधर ढवळे यांच्या तेल घाण्यावर रात्रंदिवस कष्ट करणार्या पिताजींनी, बुर्हानगरचा जड अंत:करणाने निरोप घेऊन प्रवेश केला, तो नगर शहरात.