श्री. संजय हे पदवीधर आहेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग नोकरी मागे न जाता त्यांनी व्यवसयात लावला पक्षीय राजकारणा पासुन दुर राहुन व्यवसाय व समाजकार्य करणे हा छंद जोपासला नगर व पुणे येथील वधु-वर मेळाव्याला सक्रीय सहभाग. नगर जिल्हा तेली महासभेचे क्रियाशिल सदस्य श्री. संजयशेठ या माध्यमातुन जामखेड तालुका तेली बांधवांच्या विकासाला हातभार लावतात.
बीड मधील शिरूर येथे किंवा बालम टाकळी येथे डोक्यावर गोळ्या विकणारा मुलगा. पैसे नाहीत म्हणुन शिक्षक होऊ शकत नाही. गावात रोजगार नाही. पुण्याला जाण्यास पैसे नाहीत ट्रक मध्ये बसुन पुण्यात येतो काय ? नाना पेठेतील गंजाच्या मारूती मंदिरात रहातो काय ? आणी स्वत:चे नशीब घडवुन अनेकांचे नशिब घडवीणारे श्री. ताराचंद देवराय खरेच धडपडीचे व्यवहाराचे मानवतेचे वेगळे रसायन आहे.
गावा बाहेर आठरा गुंठे जागा खरेदी करून व्यवसायाला आधुनिकतेचे स्वरूप दिले. नव्या तंत्राने मसाले कांडप करू लागले. गावात वेशी जवळ दुकान सुरू केले. सोबतीला स्टीलभांड्याचे दुकान ही सुर केले. व्यवसायाला गती येण्यासाठी श्री. मनोहरशठे दळवी, श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ, श्री. तुकाराम शेठ दळवी, श्री. ज्ञानेश्वर शेठ दळवी यांचे मार्गदर्शन लाभले अल्प शिक्षीत गाव डोंगर दर्यातील परंतु श्री. मारूती यांनी बंधुंना सोबत ठेऊन लांडे बंधु मसालेवाले ही पत निर्माण केली.
जीवनाच्या प्रवासत स्थिरता आली मामांच्या मुळे सुदुंबरे व संत संताजी माहित होते. त्यामुळे पुण्यतिथी दिवशी ते सुदुंबरे येथे येत. यातुन ओळखी वाढु लागल्या यातुनच समाज समजुन घेता आला व ते महाराष्ट्र तेली महासभेच्या संपर्कात आले. यामुळे ते मावळ तालुका अध्यक्ष झाले. गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभा त्यांनी यशस्वी पने राबविले. खाने सुमारी करण्यासाठी सोबत्यांना घेऊन तालुका पिंजुन काढला. यातुन समाज संघटन घडले. खाने सुमारी पुस्तक प्रकाशनासाठी जिल्हा कमिटी बरोबर मेहनत घेतली. त्याचे रूपांतर समाजाच्या मेळाव्यात आहे येथे दिसुन आले. पिंपरी चिंचवड येथिल संत संताजी सेवा प्रतिष्ठाण या संस्थेत काम करत आले. सन 2014 च्या वधुवर मेळाव्याचे स्वागतअध्यक्ष पद ही त्यांनी यशस्वीपणे पार पाडले. धडपड, त्याग, निष्ठा व प्रामाणिक पणा या जोडीला सौ. निता यांची साथ सोबत यशो मंदिराकडे घेऊन गेली हे ते अभिमानाने सांगतात.
तैलिकचा उदय, वादळे व गुजराथ मधील मोड (मोदी) तेली समाज. (भाग 6)
तेली समाजाची देशपातळीवरील तैलिक साहु महासभा 1947 च्या दरम्यान स्थापन झाली. त्यावेळे पासुन सर्व जातींची यादी समाजा समोर होती. परंतु 2014 पर्यंत मोड (मोदी) तेली समाज नावाची पोटजात आहे हे माहित नव्हते. या समाजाशी तेली समाजाशी नाते काय ? हे तेथिल प्रसिद्धी लिखीत माध्यमात झाले आहे याची माहिती तेथील ओबीसी समाजाचे अध्यक्ष श्री. सोळुंकी यांनी दिली. यांनी सांगितलेली माहिती सत्य का असत्य हे शोधण्याची वेळ आता आली आहे. राजस्थान मधील एक राजा होता. त्याचया दरबारात ब्राह्मण समाजा एवढे बनिया समाजाला स्थान होते.